Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय; मुंबईत सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे 11 रुग्ण आढळले. राज्यात सध्या ३५ कोरोना बाधित असून मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत.

430
Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय; मुंबईत सर्वाधिक रुग्ण
Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्रात कोरोना वाढतोय; मुंबईत सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे मंगळवारी ( १९ डिसेंबर) ११ नवीन रुग्ण आढळले आले. आतापर्यंत ३५ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २७ फक्त मुंबईत सापडले आहेत. पुण्यात २ आणि कोल्हापुरात १ रुण बाधित झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Coronavirus In Maharashtra )
भारतात कोविड-१९ चा नवा व्हेरीयंट JN.1 चा पहिला बाधित रुग्ण ८ डिसेंबर रोजी केरळ मध्ये नोंदविण्यात आला. तेव्हापासून केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आहे. देशात कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.(Coronavirus In Maharashtra )

केंद्राकडूनही सतर्कतेचा इशारा 

केंद्राकडूनही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव सुधांशपंत यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. तसेच सार्वजनिक आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखणे गरजेचे असल्याचे सांगितले.

(हेही वाचा : Sudhir Mungantiwar: छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती)

ठाण्यात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्ग आटोक्यात असतानाच मंगळवारी (१९ डिसेंबर) शहरात एका तरुणीला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्याने पालिका आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या रुग्णावर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात ही तरुणी राहत असून गेल्या अनेक दिवसापासून तिला ताप सर्दी व दमा याचा त्रास होत होता तसेच कोरोना चाचणी केल्यावर ती चाचणी पॉजिटिव आली. त्यामुळे तिला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे नमुने एनआयव्ही येथे चाचणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यानंतर हा कोरोनाचा कुठला व्हेरीयंट आहे हे समजू शकणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.