छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यात येईल तसेच महाराजांची वाघनखेही लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली.
शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक कोटी कोहिनूर ओवाळून टाकावे, असे राजे. जेव्हा गोठ्यातली गाय आणि घरातली माय धोक्यात येते, क्रूरता आपली सीमा ओलांडते तेव्हा एक तर देव अवतार घेतो किंवा शिवबा अवतार घेतात. या महानायकाचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी मी आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
(हेही वाचा – literature : साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर)
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्या वतीने जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनिल देवधर आदी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community