गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी मद्याचा ट्रक उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडला. खेड-शिवापूर नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ८२ लाख ८ हजार मद्याच्या बाटल्या जप्त केल्या.
या गुन्ह्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तब्बल ९३ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विपुल देवीलाल नट (३२, रा. देवीलालजी नट, रोहिणीया, बासवाडा, राजस्थान)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी टेम्पोमधून रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की या विदेशी मद्याची वाहतूक करीत होते. उत्पादन शुल्क विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पथक गस्तीवर होते. यावेळी मुंबई-बंगळुरू महामार्गावरून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले मद्य टेम्पोतून जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने सापळा रचून खेड-शिवापूर नाक्यावर पाळत ठेवली होती. त्याच ठिकाणी पोलिसांनी टेम्पो अडवला. तेव्हा चालकाने टेम्पोत औषधे ठेवली आहेत, अशी माहिती पोलिसांना दिली.
(हेही वाचा- literature : साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर )
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, औषधाचे बिल टीपी, टॅक्स इन्व्हॉईस आणि इ वे बिल दाखवले. असे असले तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागाला या प्रकरणाबाबत आधीच माहिती मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक ए.सी. फडतरे, जवान अमर कांबळे, अहमद शेख, एस.एस. पोंधे यांच्या पथकाने कारवाई केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community