Parliament : निलंबित खासदारांना गॅलरी प्रवेश नाही

295
Opposition March : जुनी संसद ते विजय चौक पर्यंत विरोधकांचा मोर्चा
Opposition March : जुनी संसद ते विजय चौक पर्यंत विरोधकांचा मोर्चा

संसदेत (Parliament) नियम भंग केल्यामुळे तसेच नियमबाह्य घोषणा बाजी केल्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

संसदेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या खासदारांना आता संसदेत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी  रात्री उशिरा लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक जारी करून या खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीत येण्यास बंदी घातली. त्याच वेळी, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल करणारे  खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या विरोधात दिल्लीतील एका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(हेही वाचा-IPL 2024 : रिषभ पंत नवीन आव्हानासाठी उत्सुक )

संसदेच्या (Parliament) हिवाळी अधिवेशनाचा आज १३ वा दिवस आहे. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी आणि खासदारांच्या निलंबनावरून विरोधकांचा गदारोळ आजही सुरू राहू शकतो. 13 डिसेंबर रोजी संसदेत घुसखोरीच्या मुद्द्यावर गृहमंत्र्यांकडून विधान करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत. या गदारोळामुळे विरोधी पक्षाच्या 141 खासदारांना 19 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकी 107 लोकसभेचे आणि 34 राज्यसभेचे आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.