‘यूबीटी’ च्या काळात ‘डीबीटी’ पोर्टल बंद होते. त्यामुळे ६ लाख ५६ शेतकरी २०१७ मध्ये सुरू केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिले, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्यावर केली. (Eknath Shinde)
त्याचवेळी त्यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी मागील सरकारने तरतूद केली नाही अशी टीका करताच विरोधकांनी मागील सरकारमध्ये वित्तमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे बोट दाखवले.त्यावर मुख्यमंत्र्यांनी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांवर विशेषतः ठाकरे यांच्यावर टीकेपासून सुरुवात केली. (Eknath Shinde)
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी काहींनी अचानक मोर्चात येऊन आरोप केले असे सांगत ठाकरेंना टोला लगावला.आरोपांना कामातून उत्तर देणार असल्याचे सांगत पातळी सोडून आरोप होऊ लागले असून ही राज्याची संस्कृती नसल्याचे सांगितले. २०१९ ला सत्तेत आलेले आता आरोप करीत आहेत. मी व अजितदादाही त्या सरकारमध्ये होतो हे आधीच सांगतो असे ते म्हणताच सभागृहात हशा पिकला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community