सांस्कृतिक विभागाकडून छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ पोस्टाची तिकिटे काढण्यात आली आहेत. आता यापुढे आणखी १० तिकिटे (Postage Stamp) काढण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवप्रतापदिनानिमित्त पुण्यातील नातूबाग मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, राजमाता जिजाऊ, (Rajmata Jijau) छत्रपती संभाजी महाराज, (Sambhaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे टपाल तिकिट काढण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Crime : पूर्व उपनगर हादरले, ६४ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकले )
१२ जानेवारीला तिकिटाचे अनावरण
सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे. हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या नावे पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण १२ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकासकामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community