Sushma Andhare : नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा; ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा…

Sushma Andhare यांच्यावर तात्काळ हक्कभंग आणावा', अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे. त्यानंतर उपसभापतींनी सुषमा अंधारे यांना ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे.

347
Sushma Andhare : नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा; ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा...
Sushma Andhare : नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा; ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा...

उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. त्यांच्यावर एकाच अधिवेशनकाळात दुसऱ्यांदा हक्कभंग दाखल (Infringement proposal) होण्याची वेळ आली आहे. ‘रविंद्र धंगेकर यांना (Ravindra Dhangekar) उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात बोलू देत नाहीत’, अशा आशयाचा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रसिद्ध केला होता. त्यावरून सत्ताधारी पक्षाने सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाची मागणी केली आहे.

(हेही वाचा – Naxalite attack: नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ, भामरागड तालुक्यात भीतीचे वातावरण)

रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य

‘मुळात रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) या सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्यावर तात्काळ हक्कभंग (Infringement proposal) आणावा’, अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे. रविंद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत, तर मग विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) त्यांना बोलू कशा देत नाहीत ?, असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला.

माहिती न घेता आरोप करणे चुकीचे

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. ”धंगेकर विधान परिषदेचे सदस्य नसतांना त्यांना बोलू न देण्याचा विषयच येत नाही. माहिती न घेता आरोप करणे चुकीचे असून, सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग आणायला हवा”, असा प्रस्ताव प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडला. (maharashtra assembly winter session)

(हेही वाचा – Naxalite attack: नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ, भामरागड तालुक्यात भीतीचे वातावरण)

८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी

या तांत्रिक मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर उपसभापतींनी सुषमा अंधारे यांना ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे. दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास (Infringement proposal) परवानगी देईल, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

अज्ञानाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे सौजन्य नाही ? – नीलम गोऱ्हे 

उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ”धंगेकर (Ravindra Dhangekar) इकडे सदस्य नसतांना मी कसे बोलू दिले नाही. याचे कोडे उलगडलेले नाही. अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते; पण जे स्वत:ला ज्ञानी समजतात, अशा वेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असू नये. त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे. सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) दिलगिरी व्यक्त करायला हवी. आठ दिवसांत दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रविण दरेकरांना मी हक्कभंग (Infringement proposal) मांडण्यास परवानगी देईन.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.