Railway Reservation: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल्ल

कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यास, नागरिकांची धावपळ सुरू आहे.

213
Railway Reservation: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल्ल
Railway Reservation: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल्ल

नाताळ आणि नववर्ष साजरा करण्यासाठी मुंबईकर कोकण, गोव्याला जायला सज्ज झाले असून कोकणात जाणाऱ्या वंदे भारतसह इतर सर्व नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण १०० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. (Railway Reservation)

डिसेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांचे नाताळ आणि नववर्ष गोव्याच्या किनारी साजरा करण्यासाठीचे नियोजन सुरू होते. यंदाही, कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यास, नागरिकांची धावपळ सुरू आहे. ऑनलाइन संकेतस्थळावरून आणि तिकीट खिडक्यांवरून जलदगतीने तिकिटांचे आरक्षण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर वंदे भारतचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

(हेही वाचा – SpiceJet to Bid For GoFirst : स्पाईसजेट कंपनी गोफर्स्ट खरेदी करण्यासाठी उत्सुक )

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी कुटुंबीयांसह कोकण आणि गोव्याच्या किनारी सुट्ट्या साजरे करण्याचे बेत आखले आहेत. त्यासाठी, रेल्वेला पहिली पसंती देऊन आगाऊ आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.