आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नमो ॲपवर ‘जनमताचे सर्वेक्षण’ सुरू केले आहे. या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी यांनी जनतेला भारताच्या विकासाच्या प्रवासावर आपले मत मांडण्यास सांगितले आहे. त्याच वेळी, त्यांनी स्थानिक खासदारांच्या कामाबद्दल लोकांकडून अभिप्रायही मागितला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी तीन राज्यांमध्ये तीन नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी हा सर्वे होत असल्यामुळे विद्यमान खासदारांचे टेंशन वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. (Survey on Namo App)
२०२४ साठी विजयी उमेदवाराचा शोध म्हणून नमो ॲपवर लोकप्रिय स्थानिक नेत्यांची माहिती लोकांना विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजना आणि कार्यक्रमांबाबत लोकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी नमो ॲपच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधतात.’जन मन सर्वे’ असे या सर्वेक्षणाचे नाव आहे (Survey on Namo App)
एका पोस्टद्वारे ‘जन-मन सर्वे’ ची दिली माहिती
पंतप्रधान मोदी यांनी एका पोस्टद्वारे ‘जन-मन सर्वे’ (Jan man Survey) ची माहिती दिली. “भारताच्या विकासाच्या प्रवासाबद्दल तुमचे काही मत आहे का? कोणते प्रकल्प तुम्हाला सर्वात जास्त आवडतात? तुमच्या स्थानिक खासदाराबद्दल काही प्रतिक्रिया? तुमच्या क्षेत्रातील लोकप्रिय नेते कोण आहेत याबद्दल काही सूचना आहेत का? यासाठी नमो ॲप वर फक्त जन-मन सर्वे तुमच्यासाठी आहे. त्यात सहभागी व्हा.असे आवाहनही केले आहे.
Have an opinion on India’s developmental journey?
Which schemes and projects most excite you?
Have a feedback on your local M.P. ?
Suggest who are popular leaders in your area?
Then the #JaManSurvey on the NaMo App is exactly for you.
Take it now: https://t.co/7yjaAEKXNW
— narendramodi_in (@narendramodi_in) December 19, 2023
(हेही वाचा : Eknath Shinde : ‘यूबीटी’ च्या काळात ‘डीबीटी’ पोर्टल बंद होते; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका)
२०१८ मध्ये मोदींनी या ॲप वर एक सर्वेक्षणही केले होते.
२०१८ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर, एका सर्वेक्षणानुसार पीएम किसान सन्मान निधी (शेतकऱ्यांना उत्पन्न सहाय्य प्रदान करण्याची योजना) आरक्षण आणि सामान्य वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी इतर मोहिमा सुरू करण्यात आल्या. या अंतर्गत जानेवारी २०१९ मध्ये ईडब्ल्यूएस कोटा कायदा बनवण्यात आला. या निर्णयानंतर सामान्य वर्ग भाजपसोबत उभा राहिलेला दिसला.भाजपकडून विधानसभा निवडणूकीच्या वेळी देखील आमदारांबद्दल सर्वे केले जातात. त्यामुळे खासदारांच्या या सर्वेमुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community