- ऋजुता लुकतुके
कंपनीची ही इलेक्ट्रिक कार दिसायला सेडान गाडीसारखीच आहे. पण, आतून थोडी जास्त प्रशस्त आहे. पण, तिची किंमत किती आहे? (Mercedes Benz ECQ SUV)
मर्सिडिझ बेंझ कंपनीची नवीन ईसीक्यू एसयुव्ही गाडी सध्या प्रिमिअम श्रेणीतील गाड्यांमध्ये चर्चेत आहे. याचं कारण, सेडानसारखी दिसणारी असली तरी एसयुव्ही प्रकारचं डिझाईन आणि पूर्ण इलेक्ट्रिक असलेली यंत्रणा. गाडीतील फिचर्स हे बरेचसे ईक्यूसी सेडान गाडीसारखे आहेत. (Mercedes Benz ECQ SUV)
(हेही वाचा – Eknath Shinde : ‘यूबीटी’ च्या काळात ‘डीबीटी’ पोर्टल बंद होते; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका)
इलेक्ट्रिक कार असल्यामुळे तिच्यातील बॅटरीबद्दलची उत्सुकता सगळ्यांना आहे. ईक्यूसी गाडीतील बॅटरी ही १०८.४ किलोवॅट क्षमतेची आहे. पण, ही एसयुव्ही गाडी असल्यामुळे तिचं मायलेज आणि वेगही सेडान गाडीपेक्षा थोडा कमी असणार आहे. एसयुव्ही गाडी एका चार्जमध्ये ४९० किलोमीटर जाईल असा अंदाज आहे. (Mercedes Benz ECQ SUV)
मर्सिडिझ कंपनीने नुकताच एसयुव्ही गाडीचा पहिला फोटो भारतातील ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे. (Mercedes Benz ECQ SUV)
Elevate your escapades with the all-electric charm of the all-electric EQE SUV.#Electric #EQESUV #MercedesBenzIndia pic.twitter.com/mBL0laRsDZ
— Mercedes-Benz India (@MercedesBenzInd) December 18, 2023
सात जण बसू शकतील अशा या गाडीची भारतातील किंमत २ कोटी रुपयांपासून सुरू होईल असा अंदाज आहे. सध्या या गाडीचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि मे २०२४ ला अधिकृतपणे गाडी भारतात लाँच होईल असा अंदाज आहे. गाडीचे सगळे फिचर्स आणि इंटिरिअर तसंच एक्सटिरिअर हे गाडीच्या सेडान प्रकाराशी मिळतं जुळतं आहे. (Mercedes Benz ECQ SUV)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community