अनेक शेअर बाजार (Share Market) मंदीच्या सावटाखाली आहेत, असे असतानाही भारताचा शेअर बाजार सध्या तेजीत आहे. डिसेंबर महिनाअखेर शेअर बाजारासाठी जबरदस्त लाभदायक ठरला आहे तसेच या महिन्यात शेअर बाजार जगातील पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार ठरला आहे.
बाजाराची सुरुवात बुधवारी ७१,६४७ वर उघडला होता, तर मंगळवारी बाजार ७१,५२१ वर सुरू झाला होता. बुधवारी बाजाराने तासाभरातच सुमारे ३०० अंकांची उसळी घेतली होती. मुंबई शेअर बाजारासह राष्ट्रीय शेअर बाजारातही जबरदस्त तेजी आहे. या वर्षभरात निफ्टीने गुंतवणूकदारांना ४.४० टक्क्यांचा परतावा दिला आहे, तर बुधवारी निफ्टीचा निर्देशांक २१,५९३ ऑल टाइम यावर पोहोचला आहे.
(हेही वाचा – Jagdeep Dhankhar यांच्या सन्मानात रालोआचे खासदार तासभर उभे राहिले)
गुंतवणूकदारांना ४ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
राष्ट्रीय शेअर बाजाराने २१ हजरांचा टप्पा पार केला आहे. मुंबईचा शेअर बाजारही ७२ हजारांचा टप्पा लवकरच गाठण्याची शक्यता आहे. या वर्षात मुंबई शेअर बाजारात ३००० टक्क्यांची वाढ झाली आहे तसेच गुंतवणूकदारांना ४ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात तेजी असून मुंबई शेअर बाजार लवकरच ७२ हजारांचा टप्पा पार करण्याची शक्यता असल्याचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.
हेही पहा –