उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांचा व्हिडिओ बनविणारे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदारांनी बुधवारी (२० डिसेंबर) मोर्चा उघडला. (Rahul Gandhi)
पश्चिम बंगालहून भाजपच्या खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्या नेतृत्वात भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मकर या संसदेच्या मुख्य गेटजवळ भाजपच्या महिला खासदार दोन वाजून वीस मिनिटाला गोळा झाल्या. यानंतर त्यांनी “राहुल गांधी (Rahul Gandhi) माफी मांगो” अशा जोरदार घोषणा दिल्या. (Rahul Gandhi)
(हेही वाचा – Sushma Andhare : नीलम गोऱ्हे यांचा सुषमा अंधारे यांना इशारा; ८ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी अन्यथा…)
तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी काल उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची नक्कल करीत होते तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) व्हिडिओ शूट करीत होते. यानंतर त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. (Rahul Gandhi)
भाजपच्या महिला खासदारांनी आज याचा जोरदार निषेध नोंदवित संसदेच्या आवारात घोषणाबाजी केली. घोषणा करणाऱ्या खासदारमध्ये हीना गावित, कांता कदम, संध्या रॉय, क्विन ओझा, रंजना कोली, संगीता सिंग कोली आणि रमा देवी यांचा समावेश होता. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community