- ऋजुता लुकतुके
समीर रिझवी भारतासाठी किंवा अगदी देशांतर्गतही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला नाही. पण, तीन संघ आज त्याच्यासाठी डावावर डाव लावत होते. असा हा समीर रिझवी आहे कोण? (IPL 2024 Auction)
आयपीएल २०२४ साठीच्या लिलावात उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये राहणाऱ्या समीर रिझवीला जॅकपॉट लागला जेव्हा त्याच्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जने ८.४ कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. त्याची मूळ किंमत होती २० लाख रुपये. पण, चेन्नई, गुजरात आणि पंजाब या तीनही संघांना तो हवा होता. आणि बोली चढत गेली. (IPL 2024 Auction)
(हेही वाचा – IPL 2024 Auction : पॅट कमिन्स नवीन हंगामाचा सगळ्यात महागडा खेळाडू)
चेन्नई सुपरकिंग्जला घणाघाती फलंदाजी करणारा समीर हवाच होता. त्यांनी ५० लाखांनी बोलीला सुरुवात केली. गुजरात टायटन्सही बोली वाढवत होते आणि शेवटी ७.६ कोटी रुपयांवर गुजरातचा संघ थांबला. चेन्नईला समीर रिझवी मिळणार असं वाटत असतानाच अचानक दिल्ली कॅपिटल्सनी ७.८ कोटी रुपयांची बोली लावली. मग चेन्नईने ८.४ कोटी रुपये असा भाव चढवला आणि तिथे सगळे शांत झाले. (IPL 2024 Auction)
भारताकडूनच नाही तर प्रथमश्रेणी क्रिकेटही न खेळलेला समीर आयपीएलमध्ये ८.४ कोटी रुपये मिळवून गेला. (IPL 2024 Auction)
Base Price: INR 20 Lakh
Winning Bid: INR 8.4 Crore 🔥Sameer Rizvi will feature for the Chennai Super Kings!#IPLAuction | #IPL
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2023
(हेही वाचा – Railway Reservation: मुंबईहून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचं आरक्षण फुल्ल)
विशेष म्हणजे समीर आणि त्याचे काका अन्सारी टीव्हीवर लिलाव पाहत होते आणि गुणांचं चीज झालेलं पाहून दोघांच्या डोळ्यात पाणी तराळलं. समीर उत्तरप्रदेशमध्ये कामपूरचा राहणारा आहे. परिस्थिती गरिबीची आहे. पण, क्रिकेटच्या मैदानावर २० वर्षीय समीरचं कौशल्य लपून राहत नाही. (IPL 2024 Auction)
समीर रिझवी आहे कोण?
अलीकडे युपी टी-२० लीगमध्ये कानपूर सुपस्टार्स संघाकडून खेळताना त्याने ९ सामन्यांत ४५५ धावा केल्या होत्या. यात दोन शतकंही होती. तर स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकण्याची किमयाही त्याने केली. प्रथमश्रेणी क्रिकेट तो अजून खेळला नसला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा बोलबाला आहे आणि चेन्नई, गुजरात तसंच पंजाबच्या आयपीएल फ्रँचाईजींकडून त्याला ट्रायलसाठी बोलावणं आलं होतं. त्यामुळे रणजी क्रिकेटमध्ये त्याचा जलवा दिसला नसला तरी तो आयपीएल संघांना ठाऊक होता. म्हणूनच चेन्नई सुपरकिंग्जच्या संघ निवडीत समीर रिझवी लिलावाच्या आधीपासून होता. (IPL 2024 Auction)
आता आयपीएल ही समीर रिझवीसाठी लोकांसमोर येण्याची चांगली संधी असेल. (IPL 2024 Auction)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community