Sahitya Akademi Award 2023 : कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

Sahitya Akademi Award 2023 हा साहित्य आणि भाषा क्षेत्रातील अपवादात्मक योगदानासाठी दिला जातो. पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.

1743
Sahitya Akademi Award 2023 : कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
Sahitya Akademi Award 2023 : कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीने बुधवार, 20 डिसेंबर रोजी विविध पुरस्कारांची घोषणा केली. (Sahitya Akademi Award 2023) मराठीमध्ये कादंबरीकार कृष्णात खोत (Krishnat Khot) यांच्या ‘रिंगाण’ (Ringana) या पुस्तकाला, तर कोकणीमध्ये प्रकाश पर्यकर यांच्या ‘वर्सल’ (VARSAL) या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अकादमीने कादंबरी श्रेणीत हिंदीसाठी संजीव, इंग्रजीसाठी नीलम शरण गौर आणि उर्दूसाठी सादिक नवाब सहर यांच्यासह 24 भारतीय भाषांमधील लेखकांना पुरस्कार जाहीर केले आहेत.

(हेही वाचा – Dadar DSilva Road : फेरीवाल्यांनी डिसिल्व्हा रोड अडवला, वरळी, प्रभादेवीकरांनी घरी कसे जायचे?)

नवी दिल्लीतील मंडी हाऊस येथील रवींद्र भवन येथील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात (Headquarters of Sahitya Akademi) हा कार्यक्रम झाला. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. (Sahitya Akademi Award 2023)

काय असते पुरस्काराचे स्वरूप ?

साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्य आणि भाषा क्षेत्रातील अपवादात्मक योगदानासाठी दिला जातो. हे भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण साहित्यिक वारशाला प्रोत्साहन देते आणि जतन करते. साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Akademi Award) विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.

24 भाषांमध्ये उपलब्ध भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट असलेल्या 24 भाषांना साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. या भाषांमध्ये आसामी (Assamese), बंगाली (Bengali), गुजराती (Gujarati), कन्नड, मल्याळम, मराठी (Marathi), उडिया, पंजाबी (Punjabi), तमिळ, तेलगू आणि उर्दू यांचा समावेश आहे.

(हेही वाचा – Cocaine Seized at Mumbai Airport : मुंबई विमानतळावर विदेशी महिलेने वीगमध्ये दडवले होते ‘हे’ साहित्य; महसूल विभागाने केली कारवाई)

साहित्य अकादमीची स्थापना केव्हा झाली ?

भारतीय भाषांमधील साहित्य आणि लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी 1954 साली साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली. साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. सर्वपल्ली राधाकृष्णन, अबुल कलाम आझाद, झाकीर हुसेन, उमाशंकर जोशी, महादेवी वर्मा आणि रामधारी सिंग दिनकर हे परिषदेचे अध्यक्ष होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.