Krishnamachari Srikkanth भारतीय क्रिकेटमधील ८० च्या दशकातील हिटमॅन

आज रोहित शर्माला (Rohit Sharma) हिटमॅन म्हणतात. मात्र ८० च्या दशकात Krishnamachari Srikkanth हे हिटिंग करण्यामध्ये माहीर होते.

378
Krishnamachari Srikkanth भारतीय क्रिकेटमधील ८० च्या दशकातील हिटमॅन
Krishnamachari Srikkanth भारतीय क्रिकेटमधील ८० च्या दशकातील हिटमॅन

भारतीय क्रिकेट संघाचे अनेक चांगले कर्णधार होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे कृष्णम्माचारी श्रीकांत. (Krishnamachari Srikkanth) त्यांना चिका म्हणूनही ओळखले जाते. आज रोहित शर्माला (Rohit Sharma) हिटमॅन म्हणतात. मात्र त्या काळी श्रीकांत हे हिटिंग करण्यामध्ये माहीर होते. ते ओपनिंगला यायचे आणि राइट आर्म ऑफब्रेक बॉलर होते.

(हेही वाचा – Sahitya Akademi Award 2023 : कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर)

इलेक्ट्रिकल अभियंता पदवी प्राप्त

श्रीकांतचा जन्म २१ डिसेंबर १९५९ रोजी मायलापूर, मद्रास येथे तामिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सी.आर. कृष्णमाचारी आणि आईचे नाव इंदिरा कृष्णमाचारी. त्यांचे शालेय शिक्षण विद्या मंदिरातून झाले आणि रामकृष्ण मिशन विवेकानंद महाविद्यालयातून त्यांनी प्री-युनिव्हर्सिटी पूर्ण केली. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रिकल अभियंता म्हणून पदवी प्राप्त केली. ३० मार्च १९८३ रोजी त्यांचा वुवाह विद्या यांच्यासोबत झाला. त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध अशी दोन मुले आहेत. विशेष म्हणजे दोघेही क्रिकेटर (Cricketer) आहेत. (Krishnamachari Srikkanth)

१३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व

१९८९ मध्ये त्यांची भारतीय संघाच्या कर्णधारपदी (Indian Captain) नियुक्ती झाली. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतले श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) हे पहिले कर्णधार होते. नोव्हेंबर १९८९ मध्ये श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली सचिनने पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले. ४ टेस्ट सामन्यात ते कर्णधार होते आणि सर्व सामने अनिर्णित झाले. तसेच त्यांनी १३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी चार जिंकले आणि आठ सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला.

(हेही वाचा – Goregaon Mulund Link Road : जलवाहिन्यांनी अडवले प्रकल्प रस्त्याचे काम, वाढला तब्बल ४५ कोटींचा खर्च)

आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध

पुढे श्रीकांत यांनी पुरुष निवड समितीचे अध्यक्ष (Chairman of Selection Committee) म्हणून काम केले आहे. १९८३ क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात ते खेळत होते. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या (West Indies) फायनलमध्ये सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या. ते आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध होते. भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये तमिळनाडू आणि दक्षिण झोनचे प्रतिनिधित्व केले आहे. ते आता क्रिकेट समालोचक म्हणून काम करतात. २०१९ मध्ये त्यांना BCCI ने सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. (Krishnamachari Srikkanth)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.