Pimpri Chinchwad पोलिसांनी 2 कोटी 42 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना केला परत

133

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात मागील काही दिवसांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वृद्धी झाली होती. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनावर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची उकल करत आरोपींच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसात चोरी आणि घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी आरोपींकडून नागरिकांचा लाखोंचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आलेला 2 कोटी 42 लाखांचा मुद्देमाल पोलीस आयुक्तांच्या हस्ते मूळ मालकांना परत देण्यात आला.

police1

२० डिसेंबर २०२३ रोजी पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे यांचे संकल्पनेतून गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड  (Pimpri Chinchwad) पोलीस मुख्यालय येथे पार पडला.  समारंभात एकूण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील फिर्यादींना त्यांचा मुद्दमाल परत करण्यात आला. या कार्यक्रमात गुन्ह्यांतील एकुण 484 ग्रॅम वजनाचे 21 लाख 37 हजार 140 रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच 2 चारचाकी वाहने, 8 लाख 70 हजार रुपयांच्या 22 मोटारसायकल , 14 लाख 88 हजार, 890 रुपयांचे 69 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, विविध कंपन्यांमधुन चोरीस गेलेला 1 कोटी 23 लाख 18 हजार 681 मुद्देमाल, तसेच सायबर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम  48 लाख 94 हजार रुपयांचा ऐवज असा एकूण 2 कोटी 42 लाख 59 हजार 361 रुपयांचा ऐवज मुळ मालकांना परत करण्यात आला. विशेष म्हणजे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे कार्यकाळात दुस-यांदा हा कार्यक्रम पार पडला. यापुर्वी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधून पोलीस आयुक्त यांचे शुभहस्ते वेगवेगळ्या 84 गुन्ह्यांतील सुमारे 1 कोटी 46 लाख 93 हजार 705 रुपये किंमतीचा मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादींना परत करण्यात आला होता.

(हेही वाचा Maharashtra Assembly Session : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले; पुढील अधिवेशन ‘या’ तारखेला होणार)

या कार्यक्रमात  पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad)  पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील एकूण १२५ वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकूण ४८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्याची एकूण किंमत रु.२१,३७,१४०/- तसेच २ चारचाकी वाहने किंमत रु.२५,५०,०००/-, २२ मोटारसायकल किंमत रु.८,७०,०००/-, ६९ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन किंमत रु.१४,८८,८९०/- विविध कंपन्यांमधुन चोरीस गेलेला मुद्देमाल व ३ लॅपटॉप एकूण किंमत रु.१,२३,१८, ६८१/- तसेच सायबर गुन्ह्यांसह वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम रु.४८,९४,०००/- असा एकूण रक्कम रु. २,४२,५९,३६१/- (दोन कोटी बेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे एकसष्ट रुपये) किंमतीचा मुद्देमाल मुळ मालकांना मा. पोलीस आयुक्त साो. यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

विशेष म्हणजे मा. पोलीस आयुक्त साो, विनय कुमार चौबे यांचे कार्यकाळात दुस-यांदा हा कार्यक्रम पार पडला. यापुर्वी १०.०१.२०२३ रोजी महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे चे औचित्य साधून मा. पोलीस आयुक्त साो. यांचे हस्ते वेगवेगळ्या ८४ गुन्ह्यांतील सुमारे १,४६,९३,७०५/- (एक कोटी सेहचाळीस लाख त्र्यान्नव हजार सातशे पाच रुपये) किंमतीचा मुद्देमाल मुळ मालक तथा फिर्यादींना परत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी केली. मा. पोलीस आयुक्त साो. यांनी या प्रसंगी फिर्यादींना उद्देशून तुमच्या चेह-यावरचा आनंद पाहुन पोलीस अधिकारी म्हणुन आम्हाला आमच्या कामाची पावती मिळाली. तसेच यापुढे देखील असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले जातील जेणे करुन जनतेचे मनोबल वाढेल व अधिकाधिक फिर्यादी पुढे होवनु पोलीसांकडे आपल्या तक्रारी दाखल करतील असे मनोगत व्यक्त केले. तसेच ज्या पोलीस अधिका-यांनी सदर गन्ह्यांचा तपास करुन मुद्देमाल हस्तगत केला त्यांचे अभिनंदन देखील केले. तसेच संजय शिंदे, सह पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी पोलीस अधिका-यांचे अभिनंदन व मार्गदर्शन केले. याप्रसंगी ज्यांना आपला मुद्देमाल परत मिळाला अशा काही फिर्यादींनी देखील आपले मनोगत व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.