मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष अधिवेशनाचा घाट कशाला घालताय? आहे त्याच अधिवेशनात चार दिवस वाढवून घ्या आणि आरक्षण द्या, २४ डिसेंबरनंतर १ तासही वाढवून देणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच राज्याचे काही मंत्री मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांच्या भेटीला जाणार आहेत. २४ डिसेंबरच्या डेडलाईन बद्दल चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन आणि मंत्री संदीपान भुमरे भेट घेणार आहेत.
(हेही वाचा – Learning Marathi in America : अमेरिकेमध्ये भारतीय मुले गिरवतात मराठीचे धडे)
२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) विषयावर शिंदे समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या संदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. यावर हा प्रस्ताव मान्य नसून २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावं या मागणीवर जरांगे ठाम आहेत. तसेच २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण दिलं नाही तर आंदोलनाचा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे.
(हेही वाचा – Ind vs SA 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला हवी आघाडीच्या फळीकडून दमदार सुरूवात)
अनेकदा मुदत वाढवून दिली, आम्ही येडे आहे का?
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे म्हणाले की, हे सरकार विशेष अधिवेशनाच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष अधिवेशनाचा घाट घालून वेळकाढूपणा करू नका. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यामध्ये बसतोय, बाकी कशातून आरक्षण (Maratha Reservation) दिले तर ते टिकणार नाही. त्यामुळे बाकी आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक करू नये. विदर्भातील मराठे आणि मराठवाड्यातील मराठ्यांचे संबंध आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नातेवाईक आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मराठे एकच आहेत. सध्या आरक्षण हा एकच विषय आहे, त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला सारावे आणि मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) एकत्र यावे, असेही जरांगे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community