मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर गुरुवार (२१ डिसेंबर) दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या पुणे लेनवर गँट्री बसवण्याच्या कामासाठी दोन तास वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. यापूर्वीही अनेकवेळा या मार्गावर काही कामासाठी दोन तासांचा ब्लॉक घेतला गेला आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग वापर करा अशा सूचना देण्यात येतात. (Mumbai Pune Express way block )
तुम्ही जर मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करत असाल तर वेळ आणि कुठला मार्ग वापरायचा हे पाहून प्रवास करायला निघा असे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान हा ब्लॉक घेतला जाणार आहे. हे काम करत असताना दोन तास वाहतूक बंद ठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (Mumbai Pune Express way block ) या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तब्बल ३४० कोटींचा हा प्रकल्प आहे. सध्या याची कामे या मार्गावर सुरू आहेत.
(हेही वाचा : Mumbai Police : मुंबईत महिनाभर जमावबंदी; काय आहे कारण)
‘या’ मार्गाचा करा अवलंब
पळस्पे हद्दीत ITMS प्रोजेक्ट अंतर्गत 10.750 किलोमीटर आणि 29.200 किलोमीटर अंतरावर 2 लेग सर्विसेबल गँट्री बसवल्या जाणार आहेत. या कालावधीत पुणे मार्गिकेवरील हलकी वाहने बोरले टोल नाका मार्गे जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजूकडे वळविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community