मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ (X Down) एक्स (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारे) मध्ये आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अनेक युजर्सना ट्विट करण्यात अडथळे निर्माण झाले.
एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासून अनेकवेळा ट्विटर डाउन झाल्याचं समोर आलं आहे. यापूर्वीही अनेकदा अनेक कारणामुळे एक्स डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं आहे. प्लॅटफॉर्म X (X Down) आणि X प्रोमध्ये गुरुवारी पहाटे जागतिक स्तरावर बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Me and my friend running to see Twitter Down#TwitterDown#XDown pic.twitter.com/8gCQAwPGM9
— Sia (@siaofficial9) December 21, 2023
(हेही वाचा – Mumbai : ती चौदाव्या मजल्यावरून पडली आणि …कुटुंबियांच्या काळजात झाले धस्स)
पोस्ट बघण्यात अडचणीत
सकाळी ११ वाजल्यापासून ट्विटर डाऊन (X Down) झालं होतं. त्यामुळे नेटकऱ्यांना पोस्ट बघण्यात अडचणी येत होत्या. म्हणून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. काही नेटकऱ्यांनी ट्विटर सुरू झाल्यावर या प्रकरणावर मिम्स देखील तयार केले आहेत.
Me who was trying to refresh for 69th time #TwitterDown #XDown #Elonmusk pic.twitter.com/FYiq59OIg9
— Karan Jaat (@Estd_18) December 21, 2023
(हेही वाचा – Shambhuraj Desai : समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना)
कारण अस्पष्ट
ट्विटरची (X Down) सेवा अशी अचानक ठप्प का झाली याचं कारण अजून समजू शकलेलं नाही. दरम्यान ट्विटर डाऊन झाल्याने युजर्स सतत आपलं ट्विटर अकाऊंट सुरू झाले का हे तपासून पाहत होते. भारतात ट्विटर युजर्सची संख्या मोठी असल्याने भारतातील युजर्सवर (X Down) ट्विटर ठप्प झाल्याचा मोठा परिणाम झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community