भारताने २०१४ – २३ या कालावधीत ३९६ परदेशी आणि ७० देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले,तर २००३ – १३ या कालावधीत भारताने ३३ परदेशी आणि देशांतर्गत ३१ उपग्रह प्रक्षेपित केले होते, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
(हेही वाचा – X Down : जगभरात ट्विटर ठप्प; नेटकरी हैराण)
काय म्हणाले जितेंद्र सिंह ?
मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) पुढे म्हटले की, २०१४ – २३ या दशकात उपग्रह प्रक्षेपणातून मिळणारा महसूल १५७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि २६० दशलक्ष युरो इतका आहे. २००३ – १३ या दशकात संबंधित आकडा १५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि ३२ दशलक्ष युरो होता, असे त्यांनी सांगितले.
VIDEO: प्रधानमंत्री श्री @NarendraModi ने जिस प्रकार हमें 2047 #IndiaAt100 की कल्पना दी है जब भारत शिखर पटल पर होगा, उस मंज़िल तक पहुँचने का सफ़र “अंतरिक्ष” से शुरू हो चुका है। #SansadTv #ISRO pic.twitter.com/zf2dZ1I1um
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) December 21, 2023
(हेही वाचा – Shambhuraj Desai : समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना)
येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ ६-८% दराने होईल –
अंतराळ विभागाला दिलेली वार्षिक आर्थिक तरतूद आर्थिक वर्ष २०१३ – १४ मधील ६,७९२ कोटी रुपयांवरून २०२३ – २४ साठी १२,५४४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. विविध जागतिक अंदाज आणि बातम्यांनुसार, येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ ६-८% दराने होईल, असे जितेंद्र सिंह यांनी (Jitendra Singh) सांगितले.
हेही पहा –