Opposition March : जुनी संसद ते विजय चौक पर्यंत विरोधकांचा मोर्चा

खरगे म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेबाबत सरकारने उत्तर द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन याप्रकरणी निवेदन द्यावे.

287
Opposition March : जुनी संसद ते विजय चौक पर्यंत विरोधकांचा मोर्चा
Opposition March : जुनी संसद ते विजय चौक पर्यंत विरोधकांचा मोर्चा

केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षातील खासदारांनी गुरुवारी (२१ डिसेंबर) राजधानीत जुनी संसद ते विजय चौक असा पायी मोर्चा काढला. तसेच संसद घुसखोरी प्रकरणात सरकारकडून स्पष्टीकरण मागितले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपाध्यक्ष जगदीप धनखड यांची मिमिक्री केल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. भाजप विरोधकांना कोंडीत पकडत आहे. (Opposition March)

त्याचवेळी विरोधी खासदारांनी गुरुवारी जुनी संसद ते विजय चौक असा पायी मोर्चा काढला. यावेळी विरोधी खासदारांनी गुरुवारी जुनी संसद ते विजय चौक असा पायी मोर्चा काढला. यावेळी खरगे म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेबाबत सरकारने उत्तर द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत येऊन याप्रकरणी निवेदन द्यावे. (Opposition March)

(हेही वाचा – Red Sea Crisis : कच्च्या तेलाच्या किमती बुधवारी एका सत्रात का वाढल्या?)

बहुजन समाजवादी पक्ष प्रमुख मायावती म्हणाल्या की, विरोधी खासदारांचे संसदेतून निलंबन करणे योग्य नाही. मात्र, त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची मिमिक्री दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारीही लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ झाला. आजही कामकाज सुरू होताच विरोधकांकडून गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासातच काही विरोधी खासदार घोषणाबाजी करताना दिसले. (Opposition March)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.