Delhi Fire : कनॉट प्लेसमधील गोपालदास इमारतीला भीषण आग

नवी दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील गोपालदास या इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीच्या आत अनेक लोक अडकले असण्याची शक्यता.

162
Delhi Fire : कनॉट प्लेसमधील गोपालदास इमारतीला भीषण आग

कनॉट प्लेस हे दिल्लीच्या (Delhi Fire) मध्यभागी आहे. कनॉट प्लेस ही देशातील सर्वात महागड्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथील गोपालदास इमारतीला गुरुवारी (२१ डिसेंबर) भीषण आग लागली मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

११ व्या मजल्यावर आग –

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आग (Delhi Fire) लागली. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र इमारतीच्या आत अनेक लोक अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी इमारतीच्या आत गेले आहेत.

अग्निशमन दलाच्या किमान १६ गाड्या घटनास्थळी दाखल –

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Delhi Fire) किमान १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशी लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. अग्निशमन विभागाव्यतिरिक्त अतिरिक्त कर्मचाऱ्यांनाही बचावकार्यासाठी बोलावण्यात आले आहे. (Delhi Fire)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.