नव्वदच्या दशकात गोविंदा (Govinda) हे नाव सर्वांच्याच ओठांवर होतं. अतिशय सुंदर आणि सोज्वळ चेहर्याचा हा नायक विरारमध्ये राहत होता. गोविंदा हा खासकरुन त्याच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो. डेव्हिड धवनसोबत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. गोविंदाचा जन्म २१ डिसेंबर १९६३ रोजी मुंबईत झाला. त्याचं पूर्ण नाव गोविंदा अहुजा असं आहे.
तुम्हाला कदाचित माहित नसेल की गोविंदाचे वडील अभिनेता होते. त्यांचं नाव अरुण कुमार अहुजा… अरुण कुमार यांनी चाळीसच्या दशकात अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. महबूब खानच्या औरत या चित्रपटातून अरुण कुमार यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. गोविंदाची (Govinda) आई निर्मला देवी उत्तम शास्त्रीय गायिका होती. त्यांनी अनेक चित्रपटासाठी देखील गायन केले होते. ठुमरीसाठी त्या प्रचलित होत्या.
(हेही वाचा-Dhoni & Pant Play Tennis : आयपीएल लिलावानंतर धोनी आणि रिषभ पंत यांच्यात रंगला टेनिसचा खेळ )
करिअर चांगलं सुरु असताना गोविंदाचे वडील चित्रपट निर्मिती क्षेत्रात आले आणि त्यांना तोटा झाला. म्हणून त्यांना आपला बंगला सोडून विरारमध्ये यावं लागलं. अशाप्रकारे गोविंदाचं मोठं कुटुंब सामान्य झालं. गोविंदाने कॉमर्समध्ये पदवी मिळवली. पण त्याला हीरो व्हायचं होतं. मग ८० च्या दशकात त्याला जाहिरात करण्याची संधी मिळाली. पुढे चित्रपटही मिळाले.
मात्र गोविंदा हीरो कसा झाला, यातही एक छानशी स्टोरी लपली आहे. जेव्हा तो सिने जगतात प्रयत्न करत होता. तेव्हा मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर हा चित्रपट खूप चालत होता. मग गोविंदाने डिस्को डान्सर या गाण्यावर डान्सची प्रॅक्टिस केली आणि स्वतःचा डान्स बसवला. गोविंदाला सुरुवातीपासूनच नाचायला आवडायचं. त्याने डिस्को डान्सर डान्सची कॅसेट बनवून निर्मात्यांना दाखवली. मात्र कुणीही त्याला संधी द्यायला तयार नव्हतं. अशा वेळी त्याचे मामा आनंद यांनी ठरवलं की गोविंदाला संधी द्यायची. ते त्याच्या डान्सवर फिदा झाले.
त्यानंतर गोविंदाने अनेक चित्रपटांत काम केलं. नव्वदचं दशक त्याने गाजवलं. पुढे डेव्हिड धवनसोबत मिळून त्याने अनेक विनोदी चित्रपटात काम केलं. सुरुवातीला डान्सर, रोमॅंटिक हीरो आणि विनोदी अभिनेता असा यशस्वी प्रयोग त्याने केला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community