Ram lala Pran pratishtha : श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत जगभरातील हिंदुंमध्ये उत्साह

श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताबरोबरच परदेशातही साजरा होणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये आठवडाभराचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.

200
Ram lala Pran pratishtha : श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत जगभरातील हिंदुंमध्ये उत्साह
Ram lala Pran pratishtha : श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत जगभरातील हिंदुंमध्ये उत्साह

गेल्या अनेक वर्षांचे अनेक भारतीयांचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेबाबत केवळ भारतातच नाही तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साह आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताबरोबरच परदेशातही साजरा होणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये आठवडाभराचा सोहळा (Celebration in America) आयोजित केला जाणार आहे. (Ram lala Pran pratishtha)

अमेरिकेतील हिंदू एम्पॉवरमेंट कौन्सिलतर्फे (एचएमईसी) प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील मंदिरांमध्ये श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील ११०० हून आधिक मंदिरांचे संचालन एचएमईसीतर्फे करण्यात येते. (Ram lala Pran pratishtha)

(हेही वाचा : Parliament Security : संसद सुरक्षाभंग प्रकरण; केंद्राने घेतला मोठा निर्णय वाचा सविस्तर)

 या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, उत्तर अमेरिकेतील लहान-मोठ्या मंदिरांमध्ये आठवडाभर चालणारा उत्सव १५ जानेवारीपासून सुरू होईल आणि २० जानेवारीच्या रात्री अयोध्यातून राम मंदिराच्या उद्घाटनाच्या थेट प्रक्षेपणाने हा उत्सव संपेल. या कार्यक्रमाच्या शेवटी एक संकल्प घेण्यात येणार आहे. आतापर्यंत अनेक मंदिरांनी १५ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्याची तयारी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.