Agniveer Scheme : मनोज नरवणे यांचा पुस्तकातून अग्नीवीर योजनेविषयी दावा; म्हणाले केंद्र सरकारने…

पंतप्रधान कार्यालयाने आताची ‘अग्नीवीर’ योजना आणली. याविषयी सरकारने आमच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, असा खुलासा माजी सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केला आहे.

437
Agniveer Scheme : मनोज नरवणे यांचा पुस्तकातून अग्नीवीर योजनेविषयी खुलासा; म्हणाले केंद्र सरकारने...
Agniveer Scheme : मनोज नरवणे यांचा पुस्तकातून अग्नीवीर योजनेविषयी खुलासा; म्हणाले केंद्र सरकारने...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही वर्ष २०२० मध्ये ‘टूर ऑफ ड्युटी’ (Tour of Duty) या योजनेचा प्रस्ताव दिला होता. यात ‘अग्नीवीर’प्रमाणे काही काळासाठी सैनिकभरती करण्याची सूचना करण्यात आली होती. ती केवळ भारतीय सैन्यासाठीच लागू होती; परंतु काही काळानंतर पंतप्रधान कार्यालयाने आताची ‘अग्नीवीर’ योजना (Agniveer Scheme) आणली. याविषयी सरकारने आमच्याशी कुठलीही चर्चा केली नाही, असा दावा माजी सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (Manoj Mukund Naravane) यांनी केला आहे. त्यांनी ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) हे पुस्तक लिहिले आहे. त्यात याविषयी भाष्य करण्यात आले आहे.

(हेही वाचा – BMC : मुंबईतील अनधिकृत बांधकामांचा शोध आता सॅटेलाईट इमेजेस प्रणालीच्या आधारे)

‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात दावा

या योजनेविषयी सरकारच्या घोषणेने सैन्यदल, नौदल आणि वायूदल या तिन्ही दलांना चकित केले, असे माजी सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकात केला आहे. त्यांचे हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून त्यात त्यांनी अनेक दावे केले आहेत.

नरवणे यांनी या पुस्तकात पुढे दावा केला आहे की, सैन्याने ७५ टक्के सैनिकांना सेवेत कायम ठेवण्याची सूचना केली होती; परंतु जेव्हा अग्नीवीर योजना जून २०२२ मध्ये चालू करण्यात आली, तेव्हा त्यांच्या कार्यकाळानंतर २५ टक्केच अग्नीवीरांना १५ वर्षे सेवेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा – Tuljabhavani Temple Scam : तुळजाभवानी मंदिरातील अलंकार चोरीच्या घटना चालूच; चांदीचा मुकुटही गहाळ)

केंद्र सरकारवर टीका

काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्वीट करून नरवणे यांच्या दाव्यावर म्हटले की, अग्नीवीर ही योजना कुणाशीही चर्चा न करता आणलेली विनाशकारी नीती होती. नरवणे यांनी ३१ डिसेंबर २०१९ ते ३० एप्रिल २०२२ या कालावधीत सैन्यदलप्रमुख (Chief of the Army Staff) म्हणून काम केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.