अयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 22 जानेवारी रोजी हॉटेल आणि धर्मशाळांमध्ये आगाऊ आरक्षण रद्द केले जाईल. (Rammandir Pran Pratishtha) गुरुवार, २१ डिसेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. 22 जानेवारीच्या सोहळ्याच्या दृष्टीने लोकांनी आधीच अयोध्येत मोठ्या संख्येने हॉटेल्स बुक केली आहेत. परंतु सोहळ्यासाठी येणाऱ्या महनीय व्यक्तींची सुरक्षा लक्षात घेऊन हे आरक्षण रद्द केले जाईल. (Rammandir Pran Pratishtha)
(हेही वाचा – Myanmar : म्यानमारमधील विद्रोही गटाचे चिनी सीमेलगत एका चौकीवर नियंत्रण)
विमानतळावर 100 विमाने येण्याची शक्यता
आता अयोध्येतील (Ayodhya) श्रीराम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेला केवळ एक महिना उरला आहे. उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. 22 जानेवारी रोजी केवळ तेच लोक अयोध्येत राहू शकतील, ज्यांच्याकडे श्री राम तीर्थक्षेत्र ट्रस्टचे ड्युटी पास किंवा आमंत्रणपत्र असेल. २२ जानेवारी रोजी अयोध्या (Ayodhya) विमानतळावर 100 विमाने येण्याची शक्यता आहे, त्याचे मार्ग बदलण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे.
त्रेतायुगातील वैभवानुसार अयोध्या सजवणार
30 डिसेंबर रोजी होणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पवित्र शहर अयोध्येला हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 30 डिसेंबर रोजी अवधपुरी येथे पंतप्रधान मोदींचा भव्य नागरी सत्कार होणार आहे. या प्रसंगी त्रेतायुगातील वैभवानुसार अयोध्या सजवली जाईल. (hotel booking in ayodhya)
(हेही वाचा – Myanmar : म्यानमारमधील विद्रोही गटाचे चिनी सीमेलगत एका चौकीवर नियंत्रण)
सरकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे वर्तन आदर्श असावे
“प्रत्येकाची सुरक्षा, तसेच स्वागत सुनिश्चित करणे ही आमची जबाबदारी आहे, त्यामुळे सरकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचे वर्तन आदर्श असले पाहिजे”, असे मुख्यमंत्री (Chief Minister Yogi Adityanath) म्हणाले. पोलीस दलात क्षेत्रनिहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अतिरिक्त फौज तैनात केली जावी. त्याचबरोबर एसटीएफ आणि एटीएस दलांची संख्याही वाढवावी.
अयोध्या रेल्वे स्थानक आणि विमानतळाच्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एनएचएआयच्या बायपास मार्गावरील विभाजकावर केलेली सजावट अधिक चांगल्या प्रकारे केली जावी, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community