Sarada Devi : रामकृष्ण परमहंस यांच्यासमवेत आध्यात्मिक संसार करणाऱ्या त्यांच्या पत्नी मां शारदा देवी

Sarada Devi : शारदा देवी ६ वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांचं लग्न परमहंसांशी झालं. त्यावेळी परमहंस २३ वर्षांचे होते. मात्र काही वर्षांनंतर रामकृष्ण आपल्या पत्नीला दिव्य मातेचे स्वरूप मानू लागले.

409
Sarada Devi : रामकृष्ण परमहंस यांच्यासमवेत आध्यात्मिक संसार करणाऱ्या त्यांच्या पत्नी मां शारदा देवी
Sarada Devi : रामकृष्ण परमहंस यांच्यासमवेत आध्यात्मिक संसार करणाऱ्या त्यांच्या पत्नी मां शारदा देवी

रामकृष्ण परमहंसांनी (Ramakrishna Paramhansa) विवेकानंदांना घडवून भारतावर केवढे तरी मोठे उपकार केले आहेत. रामकृष्णांच्या अध्यात्मिक आणि सांसारिक प्रक्रियेमध्ये त्यांच्या पत्नी शारदा देवींचे (Sarada Devi) मोठे योगदान होते. शारदा देवी ६ वर्षांच्या होत्या जेव्हा त्यांचं लग्न परमहंसांशी झालं. त्यावेळी परमहंस २३ वर्षांचे होते. मात्र काही वर्षांनंतर रामकृष्ण आपल्या पत्नीला दिव्य मातेचे स्वरुप मानू लागले.

(हेही वाचा – Coronavirus JN1 Variant : ‘जेएन १’ आजाराबाबत घाबरु नका, पण काळजी घ्या)

दक्षिणाकाली मंदिरात भक्तीत तल्लीन झालेले रामकृष्ण परमहंस

शारदा देवी (Sarada Devi) यांचा जन्म २२ सप्टेंबर १८५३ रोजी झाला. त्यांचे बालपणीचे नाव शारदामणी (Shardamani) होते. त्यांचे वडील रामचंद्र मुखोपाध्याय हे पौरोहित्य करणारे ब्राह्मण होते. रामकृष्ण परमहंस (Ramakrishna Paramhansa) कोलकात्याच्या (Kolkata) दक्षिणाकाली मंदिरात (Dakshina kali mandir) भक्तीत तल्लीन झाले होते. भक्तीमध्ये इतके लीन झाले होते की लोक त्यांना वेडे समजू लागले. लोकांच्या दृष्टीकोनातून ते वेडेच होते. मात्र ते ईश्वराशी एकरुप झाले होते.

वयाच्या १४ व्या वर्षी विवाह

मुलाची अवस्था पाहून त्यांची वृद्ध आई चंद्रमणीला चिंता वाटू लागली. लग्नानंतर आपल्या मुलाची मानसिक स्थिती बदलेल या विचाराने तिने त्यांचे लग्न शारदा देवीशी लावले. वयाच्या १४ व्या वर्षी शारदा देवींना सासरी आणण्यात आले. रामकृष्ण बहुतेकदा दक्षिणाकाली मंदिरात भक्तीत मग्न असायचे. म्हणून शारदा देवी (Sarada Devi) अधूनमधून माहेरी येऊ लागल्या. कशीतरी ४ वर्षे निघून गेली.

(हेही वाचा – Myanmar : म्यानमारमधील विद्रोही गटाचे चिनी सीमेलगत एका चौकीवर नियंत्रण)

रामकृष्ण परमहंसांच्या शिष्या शारदा देवी

एकदा रामकृष्णांच्या (Ramakrishna Paramhansa) तब्येतीची बातमी ऐकून शारदा देवी थेट दक्षिणाकाली मंदिरात गेल्या. तेव्हा त्या स्वतः आजारी होत्या. स्वामीजींनी शारदा देवीची सुश्रुषा म्हणून सेवा केली आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था वेगळ्या खोलीत करण्यात आली. पुढे शारदा देवी रामकृष्ण परमहंसांच्या शिष्या झाल्या. रामकृष्ण शारदा देवींची (Sarada Devi) पूजा जगन्माता म्हणून करु लागले. त्यांचा भौतिक नव्हे पण आध्यात्मिक संसार सुरु झाला. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांच्या भक्तांची आई म्हणून काळजी घेतली. २० जुलै १९२० रोजी मलेरियामुळे त्यांना हे जग सोडून जावे लागले. (Ramakrishna Paramhansa)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.