H1B Visa केवळ भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी होणार सुरू

भारतीय H-1B व्हिसा धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, U.S. विभागाने नॉन-डिप्लोमॅटिक नॉन-इमिग्रंट व्हिसांचे देशांतर्गत नूतनीकरण पुन्हा सुरू केले आहे. २४ जानेवारी पासून हा उपक्रम सुरु होणार आहे.

301
H1B Visa केवळ भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी होणार सुरू

H-1B व्हिसा पायलट प्रोग्राम फक्त भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी आहे. या अंतर्गत अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि कॅनडाच्या नागरिकांना फायदा होणार आहे. हा कार्यक्रम अशा कंपन्यांसाठी देखील आहे, ज्यांचे H-1B कर्मचारी कामासाठी परदेशात जाऊ इच्छितात. (H1B Visa)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर अनेक महिन्यांनी अनेक निर्णय घेतला आहे. जूनमध्ये जेव्हा पंतप्रधान अमेरिकेच्या राज्य दौऱ्यावर गेले होते, तेव्हा H-1B व्हिसाच्या नूतणीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम सुरू होतं. त्यांच्या दौऱ्यावेळी याची औपचारिक घोषणा करण्यात आली. (H1B Visa)

(हेही वाचा – LPG Cylinder Price update : एलपीजी ग्राहकांना दिलासा; सिलिंडरच्या दरात कपात ; जाणून घ्या के आहेत नवीन दर)

असा होणार भारतीयांना फायदा –

भारतीय – अमेरिकन समुदायाचे नेते अजय जैन भुटोरिया यांनी बायडन सरकारच्या या निरण्याचं वर्णन ‘महत्वाचं’ असं केलं आहे. या व्हिसाच्या नूतणीकरणाची प्रक्रिया सोपी केल्याने सुमारे १० लाख लोकांना फायदा होईल आणि त्यात सर्वात मोठी संख्या भारतीयांची असेल. २०२२ मध्ये युएस सरकारने ४.४२ लाख लोकांना H-1B जारी केला होता. त्यापैकी ७३ टक्के भारतीय होते. (H1B Visa)

(हेही वाचा – Coronavirus JN1 variant : मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा)

१ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार –

या व्हिसासाठी (H1B Visa) अर्ज सादर करताना अर्जदारांना अमेरिकेत राहण्याचा पुरावा मागितला जाणार नाही. शुल्क परत केले जाणार नाही आणि अर्जदारांनी नवीन अर्ज सादर करणे अपेक्षित. तसेच २९ जानेवारी २०२४ पासून १ एप्रिल २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करेल.

अर्जदारांनी ऑनलाइन (H1B Visa) पोर्टलद्वारे $२०५.०० परत न करण्यायोग्य आणि हस्तांतरणीय एमआरव्ही शुल्क भरणे अपेक्षित आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.