केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणुकीकरिता राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार निवडणूक प्रचारात दिव्यांगांसाठी अपमानास्पद भाषेचा वापर करू नये असे आयोगाने बजावले आहे.
(हेही वाचा – Sakshi Malik : … म्हणून साक्षी मलिकने घेतला निवृत्तीचा निर्णय)
प्रचारात अपशब्द वापरू नये –
आयोगाच्या नव्या गाईड लाईन्सनुसार दिव्यांगांना मुका, वेडा, आंधळा, एक डोळा, बहिरे, लंगडा, अशक्त असे शब्द वापरू नये असे आयोगाने म्हंटले आहे. प्रचारादरम्यान नेत्यांची भाषणे, सोशल मीडिया पोस्ट, जाहिराती आणि प्रसिद्धीपत्रकात देखील अपंगांसाठी अपशब्द शब्द वापरू नयेत. याचे उल्लंघन केल्यास, दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम, २०१६ च्या कलम ९२ अंतर्गत ५ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असा इशारा (Election Commission) निवडणूक आयोगाने दिला आहे.
(हेही वाचा – Weather Update : राज्यात थंडीचा पारा घसरला; रब्बी पिकांना पोषक वातावरण)
४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगांना घरबसल्या मतदान करता येणार –
यासोबतच दिव्यांगांच्या मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) गेल्या काही काळापासून अनेक प्रयत्न करत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ पासून दिव्यांगांसाठी विशेष सुविधा सुरू झाल्या आहेत. यामध्ये ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांगांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. यासाठी त्यांना निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत एक फॉर्म भरायचा होता. यानंतर शासकीय कर्मचारी मतदानासाठी अपंगांच्या घरी पोहोचले. या प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही ही सुविधा उपलब्ध होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community