Eastern Freeway Tunnel : ईस्टर्न फ्री वे मार्गावरील बोगदा गळतीमुक्त

ही गळती रोखण्यासाठी यामध्ये वॉटर प्रुफिंग, ग्राऊटिंग, प्लगिंग यासारखी कामे करण्यात आली आहेत.

794
Eastern Freeway Tunnel : ईस्टर्न फ्री वे मार्गावरील बोगदा गळतीमुक्त
Eastern Freeway Tunnel : ईस्टर्न फ्री वे मार्गावरील बोगदा गळतीमुक्त

पूर्व मुक्त मार्गावर चेंबूर आणि पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने असलेल्या बोगद्याच्या आतमध्ये पाणी गळतीच्या समस्येमुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. ही गळतीची समस्या आता दूर करण्यात आली आहे. ही गळती रोखण्यासाठी यामध्ये वॉटर प्रुफिंग, ग्राऊटिंग, प्लगिंग यासारखी कामे करण्यात आली आहेत. (Eastern Freeway Tunnel)

New Project 2023 12 22T135950.142

पूर्व मुक्त मार्गावर चेंबूर आणि पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने असलेल्या बोगद्याच्या आतील ही गळती रोखण्यासाठीच्या कामाचे कार्यादेश महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत देण्यात आले होते. बोगद्यात सुमारे २०० ते २५० मीटर अंतरापर्यंत पाणी गळती होत असल्याने काही ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावरही परिणाम झाला होता. त्यामुळे चेंबूर दिशेने तसेच पी. डिमेलो मार्गाच्या दिशेने दोन्ही बाजुला पाणी गळती रोखण्यासाठीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये वॉटर प्रुफिंग, ग्राऊटिंग, प्लगिंग यासारखी कामे समाविष्ट होती, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी स्पष्ट केले. (Eastern Freeway Tunnel)

(हेही वाचा – NPS Payments Using UPI : आता एनपीएसमधील गुंतवणूक थेट क्यू आर कोड स्कॅन करून करता येणार )

New Project 2023 12 22T140122.639

‘मायक्रो सरफेसिंग’ समवेत दुभाजकांचे सुशोभीकरण

पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्री वे) देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी सध्या मुंबई महापालिकेची आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत हा रस्ता महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. हस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर या अत्यंत महत्त्वाच्या तसेच सातत्याने वर्दळ असलेल्या रस्त्याची योग्य देखभाल आणि दुरूस्ती करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनखाली रस्ते व वाहतूक विभागाने कामे हाती घेतली आहेत. (Eastern Freeway Tunnel)

दरम्यान, या रस्त्यावर नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या ‘मायक्रो सरफेसिंग’ समवेत रस्त्याच्या दुभाजकांना रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये रोपं व हिरवळ लागवड करणे, संरक्षक भिंतींची रंगरंगोटी ही कामे देखील करण्यात येत आहेत. यासोबतच, पूर्व मुक्त मार्गावरील दुभाजकांमध्ये असलेल्या रोपांची छाटणी, नवीन रोपं तसेच हिरवळ लागवड, दुभाजकांची व मार्गिकांची आवश्यक रंगरंगोटी, संरक्षक भिंतींची रंगरंगोटी, आवश्यक तेथे धूळ व राडारोडा (डेब्रीज) हटवून स्वच्छता ही सर्व कामे सुरु आहेत, असेही उपायुक्त महाले यांनी नमूद केले. (Eastern Freeway Tunnel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.