Usman Khwaja Reprimanded : कसोटीत काळी पट्टी बांधल्यामुळे उस्मान ख्वाजाला ताकीद

यापूर्वीही ख्वाजाने आपल्या बूटांवर पॅलिस्टाईनला समर्थन देणारा संदेश लिहिला होता.

254
Usman Khwaja Reprimanded : कसोटीत काळी पट्टी बांधल्यामुळे उस्मान ख्वाजाला ताकीद
Usman Khwaja Reprimanded : कसोटीत काळी पट्टी बांधल्यामुळे उस्मान ख्वाजाला ताकीद
  • ऋजुता लुकतुके

यापूर्वीही ख्वाजाने (Usman Khwaja) आपल्या बूटांवर पॅलिस्टाईनला समर्थन देणारा संदेश लिहिला होता. (Usman Khwaja Reprimanded)

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू उस्मान ख्वाजाला (Usman Khwaja) पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ताकीद मिळाली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात एकटा उस्मान ख्वाजा (Usman Khwaja) दंडाला काळी फित लावून मैदानात उतरला होता. यापूर्वीही पहिल्या कसोटीपूर्वी सरावाच्या वेळी ख्वाजाने बूटांवर एक संदेश लिहिला होता. ‘स्वातंत्र्य हा माणसाचा हक्क आहे,’ आणि ‘सगळी माणसं समान आहेत,’ असा संदेश ख्वाजाच्या (Usman Khwaja) बूटांवर पॅलेस्टिनी राष्ट्रध्वजावरील रंगांत लिहिला होता. (Usman Khwaja Reprimanded)

(हेही वाचा – Bank Fraud Case: कॉंग्रेस नेते सुनिल केदार नागपूर जिल्हा बँक घोटा प्रकरणी दोषी, १५० कोटींचा घोटाळ्याचा १२ वर्षांनी निर्णय )

ख्वाजा (Usman Khwaja) हे बूट कसोटी सामन्यातही घालायचे होते. पण, कुठल्याही प्रकारचा धार्मिक, वांशिक आणि राजकीय अर्थ असलेला संदेश लिहिलेली वस्तू वापरायला आयसीसीची बंदी आहे. त्यामुळे आयसीसीनेच त्याला हे बूट घालण्यापासून रोखलं. (Usman Khwaja Reprimanded)

याला पर्याय म्हणून ख्वाजा दंडाला काळी फित बांधून मैदानात उतरला. हा ही एक नियमभंग असल्याचा निर्वाळा आयसीसीने (ICC) दिला आहे आणि त्याला ताकीद दिली आहे. ‘खेळाडूंना कुठलाही खाजगी संदेश लोकांना द्यायचा असेल तर त्यासाठी देशाचं क्रिकेट मंडळ आणि आयसीसीची पूर्व परवानगी लागते. तशी उस्मान ख्वाजाने घेतली नव्हती,’ असं आयसीसीने (ICC) म्हटलं आहे. (Usman Khwaja Reprimanded)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.