- वंदना बर्वे
लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. काॅंग्रेसला (Congress) केंद्रात सत्तेत यायचे असेल तर त्या पक्षाला अगोदर उत्तर प्रदेशात स्वत: च्या पायावर उभे रहावे लागणार आहे. मात्र उत्तर प्रदेशात काॅंगेसला (Congress) नेताच मिळत नसल्याचे बोलले जात आहे. दिल्ली उत्तर प्रदेश काॅंग्रेसचे (Congress) प्रमुख अजय राय यांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली होती. त्यात निवडणुकीचा आढावा घेण्यात आला होता. मात्र याच बैठकीत उत्तर प्रदेश काॅंग्रेसच्या नेत्यांनी राहुल यांच्याच विरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला. राहुल (Rahul Gandhi) यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात अत्यंत सक्रिय भूमिका घ्यावी अशी त्यांची मागणी होती. (Congress)
ढासळता जनाधार पक्षाचं नुकसान
काॅंग्रेस (Congress) पक्षाला देशात पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. कारण पक्षाचा ढासळता जनाधार पक्षाचं महत्व दिवसेंदिवस कमी करीत आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांत राहुल (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी उत्तर प्रदेशातील पक्षांच्या कार्यक्रमांना हजेरी लावलेली नाही. या राज्यात स्वत: प्रेरणा घेऊन अथवा पुढाकार घेऊन काम करणाऱ्या नेत्यांचा अभाव असल्याची तक्रार देखील राहुल गांधी यांनी केली आहे. यामुळे एकमेकांविरोधात तक्रार करण्यात मग्न असलेल्या काॅंग्रेस नेत्यांमुळे उत्तर प्रदेशात पक्ष राम भरोसे असल्याचे म्हटले जातंय. (Congress)
अखिलेश यादव काॅंग्रेसच्या बाबतीत आक्रमक
राज्यांतील नेत्यांनी केंद्रातील बड्या नेत्यांसमोर प्रामुख्याने दोन मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यातील त्यांची पहिली प्रमुख मागणी होती की, गांधी कुटुंबाने (Gandhi family) उत्तर प्रदेशच्या राजकारणात अधिक सक्रिय व्हावे. तसेच समाजवादी पक्षांसोबत होणाऱ्या संभाव्य जागावाटपाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. काही दिवसांपुर्वी तीन राज्यांत अर्थात मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानात काॅंग्रेसला (Congress) पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) काॅंग्रेसच्या बाबतील अधिकच आक्रमक झालेले दिसुन आले आहे. अखिलेश (Akhilesh Yadav) थोडक्यातच आपल्या पक्षाची बोळवण करतील अशी भीती उत्तर प्रदेशातील काॅंग्रेस (Congress) नेत्यांना वाटते आहे. आणि तशी चिंता त्यांनी श्रेष्ठींसमोर व्यक्त केली असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली. (Congress)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community