Parliament MPs Suspension : सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर विरोधकांचे आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वच विरोधक एकत्र आले होते. बेरोजगारी, वाढती महागाई आणि संसदेच्या घुसखोरी प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी तीव्र आंदोलन केले.

186
Parliament MPs Suspension : सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर विरोधकांचे आंदोलन
Parliament MPs Suspension : सरकारच्या विरोधात जंतर मंतरवर विरोधकांचे आंदोलन

संसदेतील विरोधी खासदारांच्या निलंबनाविरोधात (Parliament MPs Suspension) शुक्रवारी (२२ डिसेंबर) इंडीतील घटक (I.N.D.I. Alliance) पक्ष जंतर मंतर येथे जमले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते लोकशाही वाचवा आंदोलनात उपस्थित होते. खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडी आघाडीने पक्ष कार्यकर्त्यांना देशभरात आंदोलन करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या (Central Govt) विरोधात आवाज उठविण्यासाठी सर्वच विरोधक एकत्र आले होते. बेरोजगारी, वाढती महागाई आणि संसदेच्या घुसखोरी प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांनी तीव्र आंदोलन केले. (Parliament MPs Suspension)

संसदेतील सुरक्षेतील त्रुटींबाबत राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, जे लोक स्वतःला देशभक्त म्हणवून घेतात त्यांची हवाच गेली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) म्हणाले की, मोदी-शहा यांनी संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा डाव आखला आहे.राहुल म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनी संसद भवनात उड्या मारल्या. आम्ही सर्वांनी त्यांना उडी मारताना पाहिले. ते आत आले, थोडा धूर पसरला, भाजपचे सर्व खासदार पळून गेले… जे स्वत:ला देशभक्त म्हणवतात त्यांची हवाच गेली. ते म्हणाले, ‘देशातील तरुण मोबाईलवर (इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर) किती वेळ घालवतात हे पाहण्यासाठी मी कुणाला तरी देशात कुठेही छोटेसे सर्वेक्षण करायला सांगितले. उत्तर मिळाले – साडेसात तास. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या काळात देशातील तरुण साडेसात तास मोबाईलवर बसतात कारण त्यांच्याकडे रोजगार नाही. ही भारताची खरी स्थिती आहे. यामुळे त्या तरुणांनी संसदेत उडी मारली. (Parliament MPs Suspension)

(हेही वाचा – Election Commission of India : दिव्यांगांविषयी निवडणूक आयोगाने दाखवला विशेष आदर)

‘देशात बेरोजगारी आहे, याचा उल्लेख प्रसारमाध्यमांमध्ये झाला नाही. मिडियाने सांगितले की, खासदार संसदेच्या बाहेर बसले होते, तिथे राहुल गांधींनी (Rahul Gandhi) व्हिडिओ काढला. म्हणजे दीडशे खासदारांना संसदेबाहेर फेकले, असे त्यांनी म्हटले नाही, ते का केले, कसे केले, असे प्रश्नही माध्यमांनी उपस्थित केले नाहीत. आम्ही अमित शहांना प्रश्न विचारला – भाऊ, तुम्ही गृहमंत्री आहात, हे दोन तरुण उडी मारून कसे आले, बेरोजगारीवर दोन प्रश्न विचारले तर त्यांनी दीडशे लोकांना उचलून हाकलून दिले. हे केवळ १५० लोक नाहीत, ते भारतातील लोकांचा आवाज आहेत. (Parliament MPs Suspension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.