EWS Appointments Maratha Students : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; आर्थिक मागास वर्गातून मिळणार नियुक्त्या

201
EWS Appointments Maratha Students : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; आर्थिक मागास वर्गातून मिळणार नियुक्त्या
EWS Appointments Maratha Students : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; आर्थिक मागास वर्गातून मिळणार नियुक्त्या

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता आर्थिक मागास वर्गातून म्हणजेच ईडब्ल्यूएस (EWS) मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण SEBC चे आरक्षण रद्द झाल्यानंतर रोखलेल्या पदांची भरता आता करता येणार आहे. एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचे प्रकरण हे न्यायालयात प्रलंबित होते. या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. (EWS Appointments Maratha Students)

(हेही वाचा – D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला)

3 हजार 485 उमेदवारांना मिळणार नियुक्त्या

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. आता उच्च न्यायलयाने या नियुक्त्या आर्थिक मागास वर्गातून (Economically Weaker Section) मधून करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) निर्देशामुळे 2019 पासून नियुक्त्या रखडलेल्या 408 उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वनसेवा, कर सहाय्यक, पीएसआय, कनिष्ठ अभियंता, इतर पदांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहे. यामुळे 3 हजार 485 उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अर्थातच एमपीएसच्या 2020 पासूनच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. या परीक्षेमध्ये निवड होऊन अनेक महिने उलटले, तरीही विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. आता या नियुक्त्या होणार आहेत.

(हेही वाचा – Ayodhya Sri Ram Temple: अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, जाणून घ्या सध्याच्या ‘या’ १० घडामोडी)

ईडब्ल्यूएस आरक्षणाअंतर्गत कोणत्या सुविधा मिळणार

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकास) आहे, अशा व्यक्तींना ईडब्ल्यूएस अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकते. हे आरक्षण एससी, एसटी, एनटी यांच्यासाठी नसून थोडक्यात ओपन कॅटगरीसाठी आहे. सध्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. पण जर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले, तर त्यांना ईडब्ल्यूएस मधून आरक्षण घेता येणार नाही. (maratha reservation)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.