Nashik Simhastha : सिंहस्थकाळातील १०५२ कोटींच्या कामांचे लेखापरीक्षणच नाही, मनपाच्या अडचणीत वाढ

Nashik Simhastha : सिंहस्थासाठी एकीकडे पूर्वतयारी सुरू झाली असतांनाच सन २०१५-२०१६ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या खर्चाचा नाशिक महापालिकने हिशेब ठेवला नसल्याची बाब समोर आली आहे.

187
Nashik Simhastha : सिंहस्थकाळातील १०५२ कोटींच्या कामांचे लेखापरीक्षणच नाही, मनपाच्या अडचणीत वाढ
Nashik Simhastha : सिंहस्थकाळातील १०५२ कोटींच्या कामांचे लेखापरीक्षणच नाही, मनपाच्या अडचणीत वाढ

२०१५ च्या सिंहस्थातील १०५२ कोटींच्या कामांच्या खर्चाचे लेखापरीक्षणच झाले नसल्याची लक्षवेधी नाशिक (Nashik) शहरातील भाजपच्या आमदार सिमा हिरे (Seema Hiray), राहुल ढिकले (Rahul Dhikale) यांनी विधानसभेत उपस्थित केली होती. त्यावर प्रशासन पुढील भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात आले. (Nashik Simhastha)

(हेही वाचा – D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला)

आगामी सिंहस्थ (Simhastha) कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ समितीची स्थापना करण्यात आली असून, नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) ही सिंहस्थासाठी अकरा हजार कोटींचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. सिंहस्थासाठी एकीकडे पूर्वतयारी सुरू झाली असतांनाच सन २०१५-२०१६ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात झालेल्या खर्चाचा नाशिक महापालिकने हिशेब ठेवला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यात महापालिकेच्या माध्यमातून सिंहस्थ काळात झालेल्या १०५२ कोटींच्या कामांचे लेखापरीक्षणच (Audit) झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.

मागील खर्चाचे लेखापरीक्षण केलेले नसल्याने आगामी सिंहस्थासाठी (Simhastha) निधी मिळण्यावर त्याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक येथील सन २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २३७८.७८ कोटी रुपये विकास आराखडा (Development plan) मंजूर करण्यात आला होता.

(हेही वाचा – Indian Railway : आतापर्यंत रेल्वेच्या 14 कोटींच्या बेडशीट चोरीला; यापुढे करणार कारवाई)

नाशिक महापालिकेला १०५२.६१ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाला ६६० कोटी रुपये, तर जलसंपदा विभागाला १६९ कोटी रुपये, जिल्हाधिकारी कार्यालयाला ९८ कोटी तर नाशिक पोलिसांना ९३ कोटी रुपये निधी संमत केला होता. (Nashik Simhastha)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.