Jumbo Covid Center Scam : सुजित पाटकर सह ६ जणांची ईडीकडून मालमत्ता जप्त

जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणातील आरोपी आणि मेसर्स लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस भागीदार सुजित पाटकरसह ६ जणांची १२.२४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता तात्पुरती स्वरूपात ईडीने जप्त केली आहे.

237
Jumbo Covid Center Scam : सुजित पाटकर सह ६ जणांची ईडीकडून मालमत्ता जप्त
Jumbo Covid Center Scam : सुजित पाटकर सह ६ जणांची ईडीकडून मालमत्ता जप्त

जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळा (Jumbo Covid Center Scam) प्रकरणातील आरोपी आणि मेसर्स लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस भागीदार सुजित पाटकरसह (Sujit Patkar) ६ जणांची १२.२४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता तात्पुरती स्वरूपात ईडीने (ED) जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत वरळीतील संलग्न मालमत्ता मुंबईतील ३ फ्लॅट्स, म्युच्युअल फंड युनिट्सचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली आहे. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेसह (Mumbai Municipal Corporation) राज्यातील इतर महापालिकेकडून वैद्यकीय सामुग्री तसेच डॉक्टर, नर्स पुरवठा बाबत काढण्यात आलेल्या निविदाचा भंग करून कंत्राट मिळविणाऱ्या एका मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्मसह पाच जणांविरुद्ध आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे. लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस फर्म, डॉ. हेमंत राणा, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फर्मसह पाच जणांची नावे आहेत. (Jumbo Covid Center Scam)

सुजित पाटकर (Sujit Patkar) हे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे व्यवसायिक भागीदार आहेत. कोविड काळात मुंबईसह राज्यातील रुग्णालय तसेच जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center) यांना वैद्यकीय सामुग्री तसेच मनुष्यबळ पुरविण्यासाठी महानगर पालिकाकडून कंत्राटे देण्यासाठी निविदा काढण्यात आलेल्या होत्या. याप्रकरणी सुजित पाटकरसह तीन जणांना ईडीने (ED) अटक केली होती. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी मेसर्स लाईफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस, सुजित पाटकर (Sujit Patkar), डॉ. हेमंत गुप्ता, राजीव साळुंखे आणि संजय शहा आणि त्यांचे साथीदार, सुनील कदम (उर्फ बाळा कदम) या भागीदारांची १२.२४ कोटींची जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे. (Jumbo Covid Center Scam)

(हेही वाचा – Sassoon Hospital : ससूनमधून शिक्के चोरीला, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्यास अटक)

ईडीच्या (ED) तपासात पुढे असे दिसून आले की मनपाकडून सुजित पाटकर (Sujit Patkar) आणि मेसर्स लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या इतर भागीदारांना रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी मालमत्ता खरेदी करणे, गृह कर्जाची परतफेड करणे, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे इत्यादीसाठी निधी वळवला. या सर्व मालमत्ता फॉर्ममध्ये ओळखल्या गेल्या आहेत. दोन बँक खात्यांमधील फ्लॅट्स, म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक बॅलन्स असे एकून १२.२४ रकमेची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. पीएमएलए कायदा २००० (Money laundering) कायदा अंतर्गत ही जप्ती करण्यात आली आहे. (Jumbo Covid Center Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.