पुण्यात (Pune) विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधींच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात येईल. याकरिता समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
पाटील म्हणाले की, पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ‘सीएसआर बँक’ विकसित करण्यात येणार आहे. स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्त्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुणे शहराचा सर्वांगीण विकास हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
(हेही वाचा – EWS Appointments Maratha Students : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा; आर्थिक मागास वर्गातून मिळणार नियुक्त्या )
पुण्यातील नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, सुनील देवधर, धीरज घाटे उपस्थित होते.
आमदार मुक्ता टिळक यांच्या नावाने ‘पेटस्कॅन केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. रेडिएशन उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावरील महागडे उपचार मोफत मिळण्यास मदत होणार आहे.
हेही पहा
Join Our WhatsApp Community