मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. दोघांचे कुटुंबीय देखील या वेळी उपस्थित होते. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राज्यात पुन्हा एका राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंच्या भगिनी जयवंती आणि अभय देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा समारंभ दादरमध्ये (Dadar) झाला.
(हेही वाचा – Sassoon Hospital : ससूनमधून शिक्के चोरीला, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करणाऱ्यास अटक)
संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित
या वेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही भावांमध्ये या कार्यक्रमात चर्चा झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. या वेळी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचीही भेट झाली. दोघांनी एकमेकांची विचारपूस केल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्यकर्त्यांच्या इच्छा आणि चर्चा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी चालू होत्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, असे मनसे (MNS) आणि शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांना सतत वाटत असते. कार्यकर्त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रभर होर्डिंग लावून या इच्छा व्यक्तही झाल्या आहेत.
(हेही वाचा – Nashik Simhastha : सिंहस्थकाळातील १०५२ कोटींच्या कामांचे लेखापरीक्षणच नाही, मनपाच्या अडचणीत वाढ)
उद्धव ठाकरे यांना माझ्या इतका आतून बाहेरून कोणीही ओळखत नाही, अशी प्रतिक्रिया एकदा राज ठाकरे यांनीच दिली होती. (Raj – Uddhav Thackeray)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community