Beetroot Benefits : थंडीच्या दिवसांत प्या बीटाचा रस; मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Beetroot Benefits : बीटरूटमध्ये पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, जस्त, तांबे आणि जीवनसत्त्वे यांसह अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. सकाळी लवकर बिटाचा रस प्यायल्याने मदत होते. त्या आरोग्यदायी फायद्यांविषयी येथे जाणून घेऊया.

319
Beetroot Benefits : थंडीच्या दिवसांत प्या बीटाचा रस; मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे
Beetroot Benefits : थंडीच्या दिवसांत प्या बीटाचा रस; मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यात (Winter) तुमचा आहार आणि जीवनशैलीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. (Beetroot Benefits) एक छोटीशी चूकही हिवाळ्यात तुम्ही आजारी पडण्यास कारणीभूत ठरू शकते. थंडीच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे शरीराला सर्दी, खोकला, ताप यांसारख्या हंगामी आजारांमधून जावे लागते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात बीटाचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.

(हेही वाचा – Girish Mahajan : ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा – गिरीश महाजन)

बरेच लोक बीट सॅलडच्या स्वरूपात खातात, तर अनेकांना त्याचा रस प्यायला आवडतो. यात जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. सकाळी लवकर बीटाचा रस प्यावा, असे जाणकार सांगतात.

1. रक्ताची कमतरता

ज्या लोकांना रक्तक्षयाची (Anemia) तक्रार आहे, त्यांनी कोणत्याही स्वरूपात त्यांच्या आहारात बीटरूटचा समावेश नक्कीच केला पाहिजे. रक्तक्षय असलेल्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी बीटरूटचा रस प्यायला हवा.

2. लठ्ठपणा

लठ्ठपणाचा (Obesity) त्रास असलेल्या लोकांसाठी बीटरूट ज्यूस खूप उपयुक्त आहे. यात कॅलरीज कमी असतात आणि त्यात शून्य चरबी असते. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी सकाळी बीटचा रस प्या.

(हेही वाचा – Monkey Bites : आइस्क्रीम खाता येईना म्हणून माकडाचा सात जणांना चावा)

3. कोलेस्टेरॉलवर नियंत्रण

बीटरूटमध्ये पोषक घटक असतात, जे शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी नियंत्रणात ठेवतात. बीटरूटचा रस प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉलची पातळी (Cholesterol control) नियंत्रणात रहाते आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. सकाळी रिकाम्या पोटी बीटचा रस प्यायल्याने हृदयरोग टाळण्यास मदत होते.

4. पचनाच्या समस्यांसाठी उपयुक्त

बीटमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. फायबरने समृद्ध असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची पाचक प्रणाली (Digestive issues) सुधारण्यास मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी बीटचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन, ओटीपोटात दुखणे यांसारख्या पोटाच्या आजारांपासून सुटका मिळते. (Beetroot Benefits)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.