BMC : महापालिकेच्या कामकाजाची भाषा कोणती? अधिकाऱ्यांनाच पडला विसर

मुंबईमध्ये महापालिकेच्यावतीने सर्व भागांमध्ये सखोल स्वच्छता मोहिम राबवण्यात येत असून शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आली आहे.

979
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च
Maharashtra Bhushan Award : त्या कार्यक्रमासाठी मुंबई महापालिकेच्या तिजोरीतून केला 'हा' खर्च

मुंबईमध्ये महापालिकेच्यावतीने सर्व भागांमध्ये सखोल स्वच्छता मोहिम राबवण्यात येत असून शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी महापालिकेच्यावतीने मार्गदर्शक तत्वे बनवण्यात आली आहे. मात्र, महापालिकेचा कारभार शंभर टक्के मराठी भाषेतून करणे बंधनकारक असतानाही ही मार्गदर्शक तत्वांचा मसुदा हा संपूर्णपणे इंग्रजी भाषेत बनवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची मर्जी राखण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी हे मार्गदर्शक धोरणच इंग्रजी भाषेतून बनवतानाच महापालिकेच्या कामकाजाची भाषेला वगळल्याने महापालिकेच्या कामकाजाची भाषा नक्की कोणती असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC)

इंग्रजी भाषेत मार्गदर्शक धोरणाचा मसुदा, मराठी भाषेला तिलांजली

मुंबई महापालिकेच्यावतीने आठ आठवड्यांमध्ये म्हणजे डिसेंबर २०२३ आणि जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये प्रत्येक परिमंडळांमध्ये एक याप्रमाणे सखोल स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. या स्वच्छतेसाठी महापालिकेच्यावतीने ६१ नियम बनवण्यात आले असून त्यानुसार ही स्वच्छता मोहिम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. या स्वच्छतेच्या कामांसाठी बनवलेल्या मार्गदर्शक धोरणांचा मसुदाच इंग्रजी भाषेत बनवल्याने महापालिकेला नक्की कोणत्या भाषेत कामकाज करायचे आणि इंग्रजी भाषेतून मार्गदर्शक धोरणाचा मसुदा तयार करून मराठी भाषेला तिलांजली दिली की काय असा सवाल उपस्थित होत आहे. (BMC)

(हेही वाचा – Deep Cleaning : झोपडपट्टी भागांमध्ये ‘या’ कारणांसाठी राबवली जाणार विशेष स्वच्छता मोहिम)

सर्वांचाच भुवया उंचावल्या

राज्यात मराठी भाषा प्रेमी आणि स्थानिक भाषेतून कामकाज करण्यावर भर देणारे शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी महायुतीचे सरकार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हाती सरकारची सुत्रे आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) संकल्पनेला आकार देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या धोरणाचा मसुदाच मराठी भाषेऐवजी इंग्रजी भाषेतून बनवण्यात आल्याने सर्वांचाच भुवया उंचावल्या आहेत. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.