BMC : महापालिकेच्या सहायक आयुक्त आणि उपायुक्तांनाही रस्त्यावर पिटाळणार

दरदिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत रस्त्यावर उतरुन स्वच्छतेची देखरेख तसेच प्रदुषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन होते किंवा नाही याची पाहणी करणे हे प्रमाणित कार्यपध्दतीत बंधनकारक केली आहे.

6047
BMC : रविवारी मुंबईत एअर शो, मरीन ड्राईव्हवरील सर्व व्यवस्थेचा भार महापालिकेच्या तिजोरीवर
BMC : रविवारी मुंबईत एअर शो, मरीन ड्राईव्हवरील सर्व व्यवस्थेचा भार महापालिकेच्या तिजोरीवर

मुंबईत संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत उच्च दर्जाची स्वच्छता ठेवण्यासाठी महापालिकेने मार्गदर्शक तत्वे तयार केली असून या स्वच्छतेची देखरेख ठेवण्यासाठी तसेच प्रदुषण नियंत्रण मार्गदर्शक तत्वांचे पालन होते किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्षस्थळी भेट देण्यासाठी विभागाच्या सहायक आयुक्तांना तसेच उपायुक्तांना रस्त्यावर पिटाळले जाणार आहे. दरदिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत रस्त्यावर उतरुन याची पाहणी करणे हे प्रमाणित कार्यपध्दतीत बंधनकारक केली आहे. (BMC)

राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उच्‍च दर्जाची स्‍वच्‍छता ठेवण्‍याकरीता संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्‍ह) उपक्रम राबविण्‍याबाबत आदेश दिलेले आहेत. त्‍या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या मार्गदर्शनानुसार प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्‍यात आली आहे. या सुधारीत प्रमाणित कार्यपद्धतीनुसार स्‍वच्‍छता केली जाणार आहे. (BMC)

(हेही वाचा – Bank Fraud Case : सुनिल केदार यांनी नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांचा कारावास)

या सुधारीत एसओपीमध्ये महानगरपालिकेचे उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) आणि संबंधित सहआयुक्त/परिमंडळ उपायुक्त हे विभागांचे (वॉर्ड) वेळापत्रक, अति महत्वाच्या व्यक्तीचे मार्ग अगोदरच ठरवले जातील. यासाठी सहआयुक्त तथा परिमंडळ उप आयुक्त यांनी साप्ताहिक कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विभागांची (वॉर्ड) नावे निश्चित करावीत. त्या विभागातील महानगरपालिकेच्या सर्व आस्थापनांमध्ये संबंधित विभागाच्या (वॉर्ड) सहाय्यक आयुक्तांच्या समन्वयाने संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. विभागातील सहाय्यक आयुक्त यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करतील जे अहवाल देतील आणि त्यांच्या संबंधित विभागातील कार्यक्रमाचे वेळापत्रक देखील देतील. (BMC)

अशाप्रकारे नेमली जाणार स्वच्छतेची ठिकाणे

विभागातील (वॉर्ड) सहाय्यक आयुक्तांनी रस्त्यांची नावे, रस्त्यांची लांबी-रुंदी, पदपथाची लांबी, उद्याने/खेळाची मैदाने, बाजारपेठा, प्रसिद्ध ठिकाणे, पर्जन्य जलवाहिनी, सार्वजनिक स्वच्छतागृहे, झोपडपट्टी क्षेत्र, रस्त्यालगतच्या भिंती, फेरीवाले क्षेत्र, बेवारस वाहने, कचऱ्याची ठिकाणे आदी मालमत्तांची यादी करावी. (BMC)

सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंत्यांनी परिसरातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन बेवारस वाहने हटविणे, सार्वजनिक ठिकाण, अनधिकृत बांधकामे, धोकादायक झाडे, बॅनर व फलक हटविण्याच्या नोटीस बजावून संबंधितांना योग्य त्या सूचना कळविणे. (BMC)

(हेही वाचा – Health Minister Tanaji Sawant: ‘जेएन -१’ला न घाबरता सतर्क राहा, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सूचना)

वायू प्रदूषणासंदर्भात

मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन विभागात होत आहे यांची खात्री सहाय्यक आयुक्तांनी करावी. (BMC)

विभागातील चौपाटी नीटनेटके व स्वच्छ ठेवाव्‍यात. सर्व यंत्रसामुग्री व उपकरणे चालू स्थितीत असावी. परिमंडळातील कार्यकारी अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) हे मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स (एमपीएस) व्यवस्थित आणि कार्यक्षमतेने कार्यरत ठेवतील. परिमंडळातील कार्यकारी अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) या संपूर्ण स्वच्छता मोहिमच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभागांच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांना आवश्यक ते सर्व सहकार्य करतील. (BMC)

नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग

गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांना आपापल्या क्षेत्रात आणि विभागात संपूर्ण स्वच्छता मोहिमची माहिती देण्यात यावी, जेणेकरून सर्व नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असेल. निर्धारित दिवशी सकाळी ६.३० वाजता संपूर्ण स्वच्छता मोहिम सुरू होण्यापूर्वी निवडलेल्या भागातील सर्व मार्ग, उपमार्ग संबंधित कर्मचारी यांनी स्वच्छ करावेत. सर्व कर्मचारी गणवेश, संरक्षक उपकरणे आणि साधने पुरेशा संख्येने असतील. सकाळी ६.३० वाजल्यापासून रस्ते स्वच्छ करून ब्रशिग करावे. परिणामी होणारी धूळ व गाळ व पाण्याच्या तळ्यांसह गोळा करून नंतर फायरॅक्स/ डिस्लजिंग/ पाण्याच्या टँकरने धुतले जातील. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.