पुढील सात दिवसांत जयपूर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मोठे बॉम्ब स्फोट (Bomb threat) घडवून आणण्याचा संदेश जयपूर पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी राज्यभरात हाय अलर्ट जारी केला आहे. या संदेशाविषयी उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांनाही कळवले आहे. राजस्थान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा ज्या मोबाईल क्रमांकावरून हा संदेश आला तो एका तरुणीचा असल्याचे उघड झाले.
जयपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एक संदेश पाठवण्यात आला होता. “पाकिस्तानशी संबंधित काही गुंडांनी मला ओलीस ठेवले आहे. त्यांच्याकडे शस्त्रे आणि दारूगोळा आहे. हे लोक पुढील ७ दिवसांत जयपूर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात स्फोट घडवून आणणार आहेत, असा मेसेज जयपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर होता.
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या कामकाजाची भाषा कोणती? अधिकाऱ्यांनाच पडला विसर)
पोलिसांचा शोध सुरू…
जयपूर पोलिसांनी ज्या क्रमांकावरून धमकीचा संदेश आला तो मोबाईल क्रमांक ट्रॅक केला. तेव्हा तो मोबाईल क्रमांक भरतपूरच्या एका तरुणीचा असल्याची माहिती उघड झाली. पोलीस जेव्हा या तरुणीपर्यंत पोहोचले तेव्हा तिने अशा संदेशाबद्दल तिला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. पुढील तपासात असे उघड झाले की, मुलीचा मोबाईल हॅक करण्यात आला होता आणि कोणीतरी पोलीस नियंत्रण कक्षाला स्फोटाबाबत संदेश पाठवला होता. सायबर सेलने हॅकरचे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे शोधून काढले आहे. पोलीस जयपूर नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community