Madhuri Dixit : ‘धक धक’ माधुरीही निवडणुकीच्या रिंगणात?

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या मनात 'धक धक' वाढू लागली ती बॉलीवूडमधील अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या चर्चेने. माधुरी उत्तर मध्य मुंबई मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळू लागले. आज घाटकोपर, असल्फा भागात पोस्टरवर माधुरीचे फोटो झळकण्यास सुरुवात झाली आहे.

376
Madhuri Dixit : 'धक धक' माधुरीही निवडणुकीच्या रिंगणात?
Madhuri Dixit : 'धक धक' माधुरीही निवडणुकीच्या रिंगणात?
  • सुजित महामुलकर

लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसे राज्यातील अनेक ज्येष्ठ मंत्री आणि आमदारांच्या हृदयात धडकी भरली असून दिल्लीला जाण्यास ते अनुत्सुक असल्याचे दिसून येते. मात्र मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या मनात ‘धक धक’ वाढू लागली ती बॉलीवूडमधील अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) चर्चेने. माधुरी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. आज घाटकोपर, असल्फा भागात पोस्टरवर माधुरीचे फोटो झळकण्यास सुरुवात झाली आहे. (Madhuri Dixit)

माधुरीतर्फे स्वागत

आज घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १५९ मध्ये एका होर्डिंगवर श्री साई भक्त मंडळातर्फे लावण्यात आले असून माधुरीचा मोठा फोटो व सर्व साई भक्तांचे स्वागत ‘सौ माधुरी दीक्षित-नेने’ या नावाने करण्यात आले आहे. होर्डिंगवर रविवारी २४ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा या मथळ्याखाली माधुरीच्या वतीने सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे. (Madhuri Dixit)

(हेही वाचा – Bomb Threat: जयपूर, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात स्फोट घडवून आणण्याचा जयपूर पोलीस नियंत्रण कक्षाला संदेश)

चर्चेला उधाण

माधुरीकडून (Madhuri Dixit) अद्याप या होर्डिंगबाबत काही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. तसेच खरंच माधुरीने या होर्डिंगवर नाव देण्यासाठी परवानगी दिली का, याबाबतही साशंकता आहे. मात्र माधुरीचे (Madhuri Dixit) नाव होर्डिंगवर आल्याने मंडळाचे नाव चर्चेत आले, त्याचबरोबर माधुरीच्या नावाच्या सुरु झालेल्या चर्चेला उधाण आले आले. (Madhuri Dixit)

२०१४ पासून पूनम महाजन

सध्या लोकसभेत भाजपच्या पूनम महाजन या मतदारसंघाचे नेतृत्व करत असून भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर समाधानी नसल्याचे म्हटले जात आहे. तसेच महाजन यांच्या आधी काही वर्षे अभिनेता सुनील दत्त आणि त्यांच्या निधनानंतर दत्त यांची कन्या प्रिया यांनी मतदारसंघाचे नेतृत्व लोकसभेत केले. २०१४ पासून या मतदारसंघात भाजपच्या खासदार म्हणून पूनम महाजन कार्यरत आहेत. (Madhuri Dixit)

(हेही वाचा – Sunil Tatkare : महायुतीच्या एकत्रित सभा घेण्याचा निर्णय; सुनील तटकरे यांची महिती)

माधुरी नाही, पूनमच

दरम्यान, या विभागातील भाजपचे मंडल अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, “या विभागातून माधुरी दीक्षित नाही, तर पूनम महाजन यांनाच तिकीट मिळणार आणि त्याच लढणार. आज यासंदर्भात बैठक झाली असून महाजन यांची उमेदवारी ‘फायनल’ झाली आहे,” असा दावा मोरे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलताना केला. (Madhuri Dixit)

आमदार अनुत्सुक

भाजपने या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून अनेक दिग्गज आमदार उदाहरणार्थ सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगल प्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांसह अनेकांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची तयारी पक्षाने केल्याचे बोलले जात आहे. या आमदारांनी आपल्याला दिल्लीच्या राजकारणात रस नसून राज्यातच राहण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. (Madhuri Dixit)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.