Deep Cleaning Drive : फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि बेकायदा पार्किंगवर कारवाई

संपूर्ण स्वच्छता मोहिमेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मार्ग/पदपथावरील बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्यात येणार असून फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच बेघर यांच्यावरही कारवाई करून मुंबईतील रस्ते आणि पदपथ मोकळे आणि स्वच्छ केले जाणार आहे. याबाबतची स्पष्ट नियमावलीत बनवण्यात आली.

1164
Deep Cleaning Drive : फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते आणि बेकायदा पार्किंगवर कारवाई

राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उच्‍च दर्जाची स्‍वच्‍छता ठेवण्‍याकरीता संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (Deep Cleaning Drive) उपक्रम राबविण्‍याबाबत आदेश दिलेले आहेत. त्‍या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्‍या मार्गदर्शनानुसार प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्‍यात आली आहे. या सुधारीत प्रमाणित कार्यपद्धतीनुसार स्‍वच्‍छता केली जाणार आहे. या सुधारीत एसओपीमध्ये या कारवाईचे स्वरूप निश्चित करण्यात आले आहे.

रस्त्यावर सम/विषम पार्किंग – 

रस्त्यावर सम/विषम पार्किंगची अंमलबजावणी केली जाईल. तसेच रस्ता दुभाजकांची स्‍वच्‍छता करावी,असे नमूद केले आहे. रस्ता दुभाजकाची दुरुस्ती केली जाईल. शक्य असेल तिथे सुशोभीकरण केले जाईल.पदपथांच्या कडेला बसवलेल्‍या दगडांची कडा पूर्णपणे स्वच्छ धुतलेल्‍या (Deep Cleaning Drive) असाव्‍यात. पदपथ / रस्ता दुभाजक / रस्त्यालगत दगडांची कडा (कर्ब) या सर्व ठिकाणांची रंगरंगोटी केली पाहिजे. पदपथ स्वच्छ केले जावे, असे नमूद केले आहे.

(हेही वाचा – National Sports Awards: महाराष्ट्राचे चिराग शेटटी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार)

कला/आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची घेतली जाणार मदत

संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या (Deep Cleaning Drive) ठिकाणाहून संकलित केलेल्‍या अनावश्‍यक साहित्‍याची स्वतंत्र वाहनादवारे विल्हेवाट लावली जाईल. रस्त्यालगतच्या भिंती, ज्यांचे सुशोभीकरण करता येईल, ते सौंदर्यविषयक डिझाइन्स आणि सामाजिक संदेशांसह (विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ठरविलेल्या थीमवर आधारित) रंगवले जातील, ज्यासाठी कला/आर्किटेक्चर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. तथापि, रस्त्यांलगतच्या सर्व भिंती कोणत्याही थुंकीच्या खुणा/पोस्टर/स्टिकर्स/भित्तिचित्रापासून मुक्त आहेत याची खात्री केली जाईल.

(हेही वाचा – France Seizes Plane : फ्रान्सने जप्त केले भारतीय प्रवासी असलेले विमान; तब्बल ३०३ प्रवासी अडकले)

कचराकुंड्या रिकाम्या करून स्वच्छ करणार…

रस्त्यांची/चौकांची नावे दर्शविणारे फलक/चिन्ह, स्वच्छ आणि नीटनेटके दिसण्यासाठी रंगवले जातील. रस्त्यालगतच्या कचराकुंड्या (Deep Cleaning Drive) रिकाम्या करून स्वच्छ कराव्यात. ट्री गार्ड कचऱ्यापासून मुक्त केले जावे. बसथांब्‍यांवरील कचरा काढावा आणि बसस्थानकांवरील आसनाखालील कचरा साफ करावा. जलवाहिन्यांच्या प्रवेशद्वारावरील सर्व कचरा साफ केला जावा.

(हेही वाचा – Hindu temple vandalised in the US : अमेरिकेतील हिंदू मंदिरावर खलिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला)

लटकलेल्या वायर्स काढून टाकणार

न वापरलेल्या फ्लोटिंग वायर्स/हँगिंग केबल्स काढून टाकाव्‍यात. उड्डाणपुलावरील रेलिंग पोस्टर्स/बॅनर्स पासून मुक्त असाव्या. (Deep Cleaning Drive) उड्डाणपुल स्वच्छ आणि धुतलेले असावे. सर्व उपयोगिता मार्गीका आच्छादन / परिक्षण चेंबर्स (मलनिस्सारण / पर्जन्य जलवाहिनी/ वीज / टेलिफोन / ब्रॉडबँड) योग्य स्थितीत ठेवले जावे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.