Mumbai Pollution : मुंबईत अनेक परिसर प्रदूषित

मुंबईमध्ये धुरक्याचे साम्राज्य पाहायला मिळाले . तसेच हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८८ पर्यंत घसरला आहे.

234
Mumbai Pollution : मुंबईत अनेक परिसर प्रदूषित
Mumbai Pollution : मुंबईत अनेक परिसर प्रदूषित

मुंबई मध्ये शुक्रवारी (२२ डिसेंबर) सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण होते. वातावरणातील प्रदूषकांना आद्रतेची जोड मिळाल्याने मुंबईभर धुरक्याचे साम्राज्य होते. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सफर या हवामान प्रदूषण मापन प्रणालीनुसार मुंबई हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८८ होता. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार हा निर्देशांक १८९ होता. (Mumbai Pollution )

मुंबईत सध्या प्रदूषणाची श्रेणी मध्यम आहे. पश्चिमी प्रकोपामुळे वाढलेली आद्रता यामुळे प्रदुषके हवेमध्ये साचून आहेत. प्रदूषकांचे प्रमाण कमी असले तरी आद्रतेमुळे प्रदूषके वातावरणात अडकल्याने मुंबईत धुरकट वातावरण दिसत होते. अशी माहिती सफर चे प्रकल्प संचालक डॉ. सचिन घुगे यांनी दिले. तर संध्याकाळच्या वेळीही वारा किंवा गारवा नसल्याने उकाडा जाणवत असल्याची मुंबईकरांची तक्रार होती.तर थंडी वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी शेकोट्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेही प्रदूषण वाढले असल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. (Mumbai Pollution )

(हेही वाचा : Jammu and Kashmir : दहशतवादी हल्ल्यानंतर ४ स्थानिकांना घेतले ताब्यात)

शनिवारी वांद्रे कुर्ला संकुल येथे २६० अंधेरी पूर्व येथे २७७ तर माझगाव येथे २७३ असा हवेच्या गुणवत्त निदेशांक असण्याचा अंदाज आहे. पण मुंबईचा एकूण निर्देशांक १५९ नोंदवला जाईल असे नोंदविण्यात आले आहे. पश्चिमी प्रकोप कमी होईल तशी आर्द्रता कमी होईल आणि मुबईतील ढगाळ आणि धुरकट वातावरणात घट होईल असेही सांगण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.