राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरील महानाट्य दाखवले जाणार आहे. राज्यात ४० कोटी खर्च करून ३६ जिल्ह्यात शिवाजी महाराजांवरचे महानाट्य दाखवले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस या महानाट्य दाखवले जाणार आहे. (Maharashtra)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक ( 350th Shivrajyabhishek ceremony) वर्षानिमित्त ६ जून २०२४ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या त्या जिल्ह्यातील नामवंत मंडळीना महानाट्याला बोलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
(हेही वाचा : Ajit pawar : संभ्रम नको, मी कमळ चिन्हावर निवडणूक लढविणार नाही- अजित पवार)
३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन
३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर महानाट्य आयोजन करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची,विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली वारशाला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community