- ऋजुता लुकतुके
भारतीय एकदिवसीय संघाचा बदली कर्णधार के एल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या सामन्यात ३५ चेंडूत २१ धावा केल्या. आणि त्या दरम्यान त्याने एका कॅलेंडर वर्षात १,००० धावांचा टप्पाही गाठला. ही कामगिरी करणारा भारताचा तो फक्त दुसरा यष्टीरक्षक फलंदाज आहे. पहिला आहे अर्थातच महेंद्रसिंग धोनी.(K L Rahul Record)
२०२३ मध्ये राहुलने २७ एकदिवसीय सामन्यांत १,०६० धावा केल्या आहेत त्या ६६ धावांच्या सरासरीने. या वर्षी राहुलच्या नावावर ३ शतकं आणि ७ अर्धशतकं आहेत. तर त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे १११ नाबाद.(K L Rahul Record)
(हेही वाचा – Coronavirus : भारतात ४२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, चार जणांचा मृत्यू)
१६ वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीने ही कामगिरी केली होती. २००७ मध्ये धोणीने ३७ सामन्यांमध्ये १,१०३ धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि ७ अर्धशतकं होती. तर त्याची सरासरी होती ४४ धावांची. त्यानंतर २००९ मध्ये धोनीने पुन्हा एकदा ही कामगिरी केली. यावेळी त्याने ५३ धावांच्या सरासरीने १,०९७ धावा केल्या त्या १ शतक आणि ९ अर्धशतकांसह. धोनीची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या होती १२४ धावांची.(K L Rahul Record)
धोनीनंतर १६ वर्षांनी के एल राहुलने या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.(K L Rahul Record)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community