- ऋजुता लुकतुके
भारतीय संघात (Indian team) दिला जाणारा इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द सीरिजचा पुरस्कार साई सुदर्शनला (Sai Sudarshan) मिळाला आहे.
भारतीय संघाने (Indian team) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. या मालिकेत सलामीवीर साई सुदर्शन (Sai Sudarshan) शेवटच्या दोन सामन्यांत खेळला. पण, त्याने चांगली छाप पाडताना दोन अर्धशतकं केली. त्याचबरोबर मैदानातील त्यांच क्षेत्ररक्षणही उजवं होतं. त्याचंच फळ त्याला मिळालं ते इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द सिरीज या पुरस्काराने.
भारताचे क्षेत्ररक्षणातील प्रशिक्षक टी दिलिप यांनी भारतीय खेळाडूंसाठी हा पुरस्कार सुरू केला आहे. विश्वचषकात प्रत्येकच सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षक निवडला जायचा. पण, आता प्रत्येक मालिकेनंतर हा पुरस्कार दिला जातो आणि एकदिवसीय मालिकेत हा मान साई सुदर्शनला (Sai Sudarshan) मिळाला आहे.
Catch of the series – Sai Sudharsan 🫡🔥pic.twitter.com/tKr2Vrj3tq
— Johns. (@CricCrazyJohns) December 21, 2023
(हेही वाचा – Mumbai Pollution : मुंबईत अनेक परिसर प्रदूषित)
टी दिलिप हे कसोटी संघाबरोबर असल्यामुळे भारतीय ए संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक अजय रात्रा यांनी यावेळी पुरस्कार विजेत्याची निवड केली. संजू सॅमसन, के एल राहुल आणि सुदर्शन यांच्यात कडवी स्पर्धा होती असं रात्रा यावेळी म्हणाले.
के एल राहुलनेही यष्टीमागे सहा झेल टिपले होते. तर सुदर्शनने तिसऱ्या सामन्यात टिपलेला क्लासेनचा झेल निर्विवादपणे मालिकेतील सर्वोत्तम झेल होता. त्यामुळे हा पुरस्कार सुदर्शनला (Sai Sudarshan) मिळत असल्याचं रात्रा यांनी सांगितलं.
𝗗𝗿𝗲𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗼𝗼𝗺 𝗕𝗧𝗦 | 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁 𝗙𝗶𝗲𝗹𝗱𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗢𝗗𝗜 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀
A 2⃣-1⃣ ODI series win in South Africa 🏆👌
Any guesses on who won the Impact fielder of the series medal? 🏅😎
WATCH 🎥🔽 #TeamIndia | #SAvINDhttps://t.co/z92KREno0C
— BCCI (@BCCI) December 22, 2023
भारतीय संघाने (Indian team) दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये विराट कोहली कर्णघार असताना भारतीय संघाने (Indian team) मालिका ५-१ अशी जिंकली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community