गुगल मॅप ही आता जगभरातील लोकांचा विश्वासू मार्ग दखविणारे सगळ्यांच्या पसंतीचे ॲप बनलेले आहेत. अनोळखी ठिकाणांबाबत ‘मार्ग’दर्शन करणारे हे ॲप नवीन वर्षात नव्या वैशिष्ट्यांसह (New Updates) भारतीयांच्या भेटीस येणार आहे. या नवीन फीचर मध्ये कमी इंधन लागणारा मार्ग दाखवला जाईल. तर हे ॲप केवळ रस्ता दाखविण्याचे काम करत नसून आता कुठे पेट्रोल कमी लागेल, वेळेची बचत होईल या सर्वाची माहिती मिळणार असल्याचे गुगल मॅप या ॲपचे उपाध्यक्ष मरियम डेनियल यांनी सांगितले. (Google Map)
ॲड्रेस डीस्क्रीप्टर
आतापर्यंत लोकेशन शेअर केल्यावर अक्षांश व देशांतरानुसार पत्ता समजून घेतला जातो. आता लोकेशन शेअर केल्यावर जवळपासचे पाच सहा लॅंडमार्कसह नेव्हीगेशनही उपलब्ध होईल. हे फीचर १५ जानेवारी पासून सुरू होणार आहे.Google Map
(हेही वाचा : Politician and Disease : जेलवारी टाळण्यासाठी रुग्णालयांचा आधार)
लेन्स इन मॅपस
युजरने एखाद्या मार्गाचे दृश्य लेन्सने कॅप्चर करताच आजूबाजूची ठिकाणे कोणती आहेत याची माहिती मिळणार आहे. तसेच वॉकिंग डिसटन्सवर काय काय आहे. हे जाताना ॲरो दिशा व अंतराचा मार्क यावर दिसेल. तर दाखविलेला मार्ग सोडून दुसरीकडे वळण घेतल्यास इंडिकेशन येणार आहे किंवा फोन व्हायबरेट झाल्यावर आपण रस्ता चुकलो हे कळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community