Ram Mandir Inauguration : राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपकडून आठवड्याभराचा कार्यक्रम

सात दिवस मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २२ जानेवारी या दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे.

188
Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण; अधीर रंजन चौधरी यांनाही निमंत्रण
Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण; अधीर रंजन चौधरी यांनाही निमंत्रण

अयोध्येत २२ जानेवारी २०२४ ला भव्य राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात हा दिवस उत्साहासारखा  साजरा होणार आहे. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहे. यातच महाराष्ट्रतील राम भक्तासाठी आनंदाची बातमी आहे. (Ram Mandir Inauguration)

महाराष्ट्रातून भाजपाकडून विशेष तयारी करण्यात येणार आहे. राज्यात सुद्धा हा सोहळा साजरा करण्याचे ठरविले आहे. सात दिवस मुंबईच्या भाजपा प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २२ जानेवारी या दरम्यान या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(Ram Mandir Inauguration)

भाजपा कार्यालयात होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी रामाची मोठी फ्रेम तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच अनुप जलोटा, अभिनेत्री दिपीका चिखलिया, अरुण गोविल यांचीही उपस्थिती राहणार आहे.  (Ram Mandir Inauguration)

(हेही वाचा : Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, ‘ब्राह्मणांना कोणतेही आरक्षण नाही हे परमेश्वराचे उपकार’)

अशी असेल कार्यक्रमाची रूपरेषा

  • १५ जानेवारीला या कार्यक्रमांच उद्घाटन होणार आहे.
  • १६ जानेवारीला सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
  • १७ जानेवारीला संध्याकाळी अलका झा,सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांचा भजनाचा कार्यक्रम असेल.
  • १८ जानेवारीला अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
  • २० जानेवारीला कार्यक्रमात रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
  • २१ जानेवारीला कवी मनोज शुक्ला यांचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.
  • २२ जानेवारीला पद्मश्री सुरेश वाडकर यांचे देखील कार्यक्रम ठेवण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.